Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार

Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार

Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage
Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत. डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार (Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage) या विषयी सखोल माहिती. तरी आपण संपूर्ण माहिती अचूक पने वाचावी अशी आपणास विनंती जेणेकरून तुम्हाला त्या विषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही.तर आज ची बातमी तुमच्या साठी खास राहणार आहे. तर मोत्रांनो आपण आजच्या लेखातून एका खास फळ शेती विषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे krushipoint.com या वेबसाईट वर तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या एका tool वर तर बघूया डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार या शेती विषयी संपूर्ण पूर्ण माहिती. चला तर मंग या शेती ची पुरेपूर माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत.

Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार
तर शेतकरी मित्रांनो आपण डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार बघणार आहोत. कीड नियंत्रण किंवा व्य्वस्थापन यामध्ये सर्वप्रथम किडीची ओळख असणे हे महत्वाचे आहे. तसेच एकदा त्याची ओळख पायल्यानंतर त्या किडी कशा पद्धतीने नुकसान करतात हे अभ्यासणे तितकेच महत्त्वाचे आहे. किडींच्या नुकसान करण्याच्या प्रकारानुसार पाने कुरतडणारी कीड, रस शेषन करणारी कीड, खरवडून खाणारी कीड, खोड पोखरणारी कीड, फळे पोखरणारी कीड, पानाच्या पापुद्र्यात राहून नुकसान करणारी कीड, इत्यादी प्रकार पडतात. वेगवेगळ्या किडींचे नुकसान करण्याचे प्रकार भिन्न असतात. ते त्यांच्या खाण्याचा पद्धतीनुसार बदलत असतात. या सर्व बाबींचा आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत.

Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage
Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman पिकांवर रोग येण्यासाठी आवश्यक असणारे हवामान

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. http://foodietastey. com

तर मित्रांनो डाळिंब पीक या वरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार आपण बघूया.

१) किडींचे नाव :
फळ पोखरणारी अळी (deudorix isocrates) Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार

किडींची ओळख :
हि अळी जाड व आखूड बांध्याची असून विटकरी रंगाची असते. त्यावर पांढरे ठिपके असतात. तिची पूर्णावस्था (फुलपाखरे) माध्यम आकाराची व भुरकट रंगाची असतात. मादीच्या पुढील नारिंगी रंगाचा ठिपका असतो. अंडी दीर्घवर्तुळाकार चकचकीत पांढऱ्या रंगाची असतात.

नुकसानीचा प्रकार :
आळ्या अंड्यातून बाहेर पडल्यावर फळात शिरतात. व आतील भाग पोखरुण खातात. बऱ्याचदा फळावर फळे सडतात व गळतात व अशा फळांचा दुर्गंधीयुक्त वास येतो

२) किडींचे नाव : साल खाणारी अळी (inderbela tetraonis)

किडीची ओळख :
अळी मळकट पिंगट चॉकलेटी रंगाची व दंडगोलाकृती असून लांब केस असतात. पूर्ण वाढलेली अळी ३५ ते ४० मिमी. लांब असते. पतंग भुरकट रंगाचा मध्यम आकाराचा व मजबूत बांध्याचा असतो.

नुकसानीचा प्रकार :
सुरुवातीला अळी खोडापासून फांदी निघण्याच्या जोडावर साल कुरतडून अळी, तिने कुरतडलेल्या सालीचा भुगा, अळीची विष्ठा व लाळ जाळी तयार करते. हि जाळी आतून भुयारी असून अळी त्यात राहून साल खात असते व खोडाला छिद्रे केली जातात. दिवस आळी खोडातील छिद्रात राहते व रात्री बाहेर येऊन जाळीच्या आत राहून साल खाते पुढे सरकते. अळीने फांदीची साल खाल्यास अन्नपुरवठा खंडित होऊन संबंधित फांदी वळते.

३) किडीचे नाव : मावा (aphis punicae)

किडीची ओळख :
मावा रंगाने पिवळसर किंवा फिक्कड हिरवा असून त्याचा आकार अंडाकृती गोल असतो. त्यांची लांबी १ ते २ मिमी. असते. पिठीवर मागच्या बाजूने सूक्ष्म अशा दोन नलिका (cornicles) असतात. बहुतांशी मावा पंखविरहित असतात. पण पंख असलेले. मावा कीटकसुद्धा आढळतात. पंख पातळ पारदर्शक असतात.

नुकसानीचा प्रकार :
प्रौढ व पिल्ले दोन्ही सोंडेद्वारे कोवळी पाने, फुले, शेंडे, कोवळ्या फळातून व पानातून रस करतात. त्यामुळे लहान काळ्या, फुले, फळे, गळून पडतात रस शोषण करत असताना शरीरातून एक प्रकारचा चिगट व साखरेसारखा गोड पदार्थ झाडावर दत्त असतात या चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते. व प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. अतिशोषणामुळे वाढ खुंटते व उत्पादनात घट येते.

४) किडीचे नाव : फुलकिडे

किडीची ओळख :
फुलकिडे आकाराने लागण व लांबोळे असतात. व त्यांची लांबी १ मिमी. किंवा त्यापेक्षा थोडी कमी असते. फुलकिड्यांचा रंग पिवळसर किंवा काळसर असतो. पिल्लाना पंख नसतात. प्रौढ फुलकिडयांना पंख असतात. पिल्ले फार लहान असून ती पांढरट-पिवळसर असतात.

नुकसानीचा प्रकार :
प्रौढ फुलकिडे व त्यांच्या बाल्यावस्था अन्नरस शोषण करत असतात. पानाचा खालील भाग आणि फळांवरील पृष्ठभाग खरडून काढतात. अशा प्रकारे झालेल्या जखमेतून (खरडल्यामुळे) बाहेर येणार अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पानांचा वरील भाग पिवळसर पांढरा व नंतर तपकिरी होतो. प्रर्दूर्भाग झालेली पाने व फुलकल्या जाडसर, वक्र होऊन आकसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंडते व कधी-कधी झाडे पूर्ण वाळतात

Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.

1 thought on “Identification of Pomegranate Crop Pests and Types of Damage डाळिंब पिकावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार”

Leave a comment