What is the benefit of giving heat to the soil ? जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ?

What is the benefit of giving heat to the soil ? जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ? best 

What is the benefit of giving heat to the soil ? जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ?
What is the benefit of giving heat to the soil

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि त्याने आपल्या शेतीमध्ये लागवड करत असणाऱ्या पिकांना खूप मोठा फायदा होतो. व पिकातील उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ? तर मित्रांनो आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बारी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी.

What is the benefit of giving heat to the soil ? जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ?

शेतकरी मित्रांनो जमिनीला उन्हाचा ताप देणे म्हणजे काय तर मित्रांनो आपण ज्या वेळेस जमीन लागवाडीच्या आधी जमीन नांगरणी करतो त्यावेळेस आपलयाला ४० ते ५० दिवसापर्यंत जमीन लागवड करू नये. जेणेकरून जमिनीत असलेली पाण्याची मात्रा कमी होईल आणि उन्हाच्या तापमानाने आपल्या शेतीला कडक उब मिळेल आणि त्या मुळे जमीन तापली जाईल.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. 1 tan shenkhatat asnare anndravy ani tyanche fayde १ टन शेण खतात असणारे अन्नद्रव्य आणि त्यांचे फायदे
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. http://foodietastey. com

किडींचे नियंत्रणWhat is the benefit of giving heat to the soil

शेतकरी मित्रांनो जमीन तापल्यामुळे बरेचसे फायदे आपल्या शेतीला होत असतात. आणि असे अनेक फायदे आपलया शेतकरी मित्रांना माहित नसतात. त्यामुळे शेतीमध्ये होणारे. न कळणारे नुकसान त्या शेतकऱ्याला भोगावे लागते. तर मित्रांनो आपण ज्या वेळेस जमिनीला उन्हाचा ताप देतो त्यावेळेस फायद्यांचा विचार केला तर मातीतील रासायनिक बदलामुळे काही प्रकारच्या किडींचे हि नियंत्रण होते. कारण जमिनीवर असणाऱ्या काही किडी तापमानाच्या चटक्यामुळे खूप काही प्रमाणात नष्ट होतात. तर हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे जमिनीला उन्हाचा ताप दिल्या जाण्याचा.

बुरशी आणि जिवाणूंचे नियंत्रण

तर शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणायचं झाला तर उन्हाचा ताप दिल्याने माहितीतील हानिकारक बुरशी व जिवाणूंचे बऱ्यापैकी नियंत्रण केले जाते कारण जमिनीत आपल्याला दिसल्या हि न जाणारी काही बुरशी आहे जी कि जमिनीत ओलाव्यामुळे टिकून असते. तर जमीन नांगरणी करून झाल्यामुळे माती मोकळी होते आणि त्यामुळे जमिनीचा ओलावा नाहीसा होतो व ओलावा नाहीसा झाल्याने जे कि हानिकारक बुरशी व जिवाणू असतात ते बऱ्यापैकी नियंत्रणात केले जातात.

निमॅटोड, कोषावस्थेतील किडींचे नियंत्रण

तिसरा मुद्दा म्हणायचं झाला तर जमिनीतील हानिकारक जिवाणू, निमॅटोड, कोषावस्थेतील किडी इत्यादींचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. आता आपणास प्रश्न पडला असेल कि कोषावस्थेतील किडी कोणत्या तर शेतकरी मित्रांनो ज्या हि किडी अंड्यांमध्ये असतात व त्यांना बाहेर येण्यास वेळ लागतो. अश्या किडींना कोशावस्थेतील किडी असे म्हणतात. ज्या कि आपल्या पिकांच्या मुळाजवळ असतात. किंवा जमिनीत कुठेहि राहू शकतात.

तणांचे नियंत्रण

तर मित्रांनो शेवटचा मुद्दा म्हणजे जमिनिला उन्हाचा ताप दिल्याने आपल्या शेतातील काही प्रकारच्या ताणांवरही चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. ते असे कि ज्या वेळेस आपण जमीन नांगरणी करतो त्यावेळेस काही तणे हे जमिनीमध्येच असतात. आणि त्यांचे काही भाग हे ओलाव्यामुळे जसेचतसे जमिनीत काही काळ टिकून असतात. त्यामुळे ते परत उगवतात. म्हणून जमिनीला टॅप दिला जातो जेणेकरून जमीन काही काळ तापली कि जे हि जमिनीत तणांचे उरलेले भाग किंवा बिया असतात. त्या वाळून जातात. किंवा उष्णतेमुळे खराब होऊन जातात.

What is the benefit of giving heat to the soil ? जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ?
अश्याच काही कारणांमुळे जमिनीची उन्हाळ्यात नांगरणी केली जाते. व करावी जेणेकरून जमीनीला उन्हाचा ताप दिलय जाईल. आणि आपल्या शेतात होणारे उत्पन्न दुपटीने वाढेल. कारण जर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले तर कोणताही शेतकरी कर्जबाजारी होणार नाही आणि आत्महत्या करणार नाही हाच आमचा शेवटचा उद्देश.

What is the benefit of giving heat to the soil ? जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ?
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार

1 thought on “What is the benefit of giving heat to the soil ? जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ?”

Leave a comment