1 tan shenkhatat asnare anndravy ani tyanche fayde १ टन शेण खतात असणारे अन्नद्रव्य आणि त्यांचे फायदे

1 tan shenkhatat asnare anndravy ani tyanche fayde १ टन शेण खतात असणारे अन्नद्रव्य आणि त्यांचे फायदे 

1 tan shenkhatat asnare anndravy ani tyanche fayde
1 tan shenkhatat asnare anndravy ani tyanche fayde

शेतकरी मित्रांनो आपण आज च्या ब्लॉग मध्ये आपण जे शेतीमध्ये शेणखत वापरतो त्यामध्ये असणारे अनेक अन्नद्रव्य आहेत. तर ते आपल्याला माहित नाही तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण शेणखतामध्ये कोणकोणते अन्नद्रव्य आहे. आणि त्यांचे काय काय फायदे आहे. हे बघणार आहोत. तर आपण हि माहिती संपूर्ण काळजीपूर्वक वाचावी आणि समजून घ्यावी. जेणेकरून आपल्या शेती मध्ये उत्पन्नाची वाढ होईल. आणि जमीन हि भुसभुशीत राहील.

शेतकरी मित्रांनो आपण सगळेच आपले शेतामध्ये शेणखत टाकत असतो. पण त्यामधून कोण कोणते अन्नद्रव्य मिळतात असा कधी विचार केला आहे का ? तर त्याचा आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघूया. कोणकोणती अन्नद्रव्य आणि ती किती प्रमाणात मिळतात, आणि त्यांचे फायदे कश्या प्रकारे आहे.

तर मित्रांनो आपल्याला यामध्ये एक टन शेणखतापासून मिळणारे अन्नद्रव्ये

नत्र (N) ५.६ किलो

स्फुरद (P) ३.५ किलो

पालाश (K) ७.८किलो

गंधक (S) १ किलो

मंगल (Mn)२०० ग्रॅम

जस्त (Zn)९६ ग्रॅम

लोह (Fe)८० ग्रॅम

बोरॉन (B)२० ग्रॅम

मॉलीब्डेनम (Mo)२.३ ग्रॅम

1 tan shenkhatat asnare anndravy ani tyanche fayde

अश्या प्रकारे आपल्याला १ टन शेणखतामध्ये एवढे अन्नद्रव्य मिळतात.
आता आपण या अन्नद्रव्यांमुळे शेतीसाठी काय काय फायदे होणार आहे ते बघणार आहोत.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. http://krushipoint.com

नत्र अन्नद्रव्याची कार्ये :

नत्रामुळे पिकांच्या पानांस हिरवा रंग प्राप्त होतो.
पिके लहान असताना नत्र दिल्यास पिकांची वाढ जलद गतीने होते.
पालेभाजी आणि चारा पिकांमध्ये लुसलुसीतपणा वाढतो.
पिकांच्या दाण्यांतील आणि चारा पिकांमधील प्रधीनांच्या प्रमाणात वाढ होते.
नत्र हे अन्नद्रय स्फुरद, पालाश, गंधक या अन्नद्रव्यांच्या शोषणामध्ये महत्त्वाचे कार्य करते.

स्फुरद अन्नद्रव्याचे कार्य :

पिकांची पेशी विभाजन आणि विकास यामध्ये स्फुरताचे कार्य आहे.
पिकांच्या रोग अवस्थेत मुळांची वाढ होते. आणि विकास चांगल्या प्रकारे होऊन रोप जोमाने वाढतो.
पिकांच्या खोडाला मजबूत पना येतो.
पिकांमध्ये फुलोरा आणि बीज धारणेमध्ये स्फुरदमुळे मदत होते.

पालाश अन्नद्रव्याची कार्ये:

पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवतो.
तृणधान्य पिकांमध्ये मजबूतपणा येतो.
फळपिकांमध्ये फळांचा आकार वाढून, चव आणि साठवण क्षमता वाढते.
पालाश मुले संप्रेरकांच्या क्रियेमध्ये वाढ होते.
या अन्नद्रव्यामुळे कोणत्याची फळपिकांमध्ये साखरेचे प्रमाण वाढते.

गंधक अन्नद्रव्याचे कार्ये :

वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ यामध्ये आढळते.
फळे तयार होण्यास व पिकविण्यास आवश्यकता असते.
गंधक कमी पडल्यास १८ टक्कयापर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते.
गंधक हा वनस्पतीची मुळे तयार करण्यास व त्यांची वाढ करण्यास मदत करते.

मंगल अन्नद्रव्याची कार्ये :

प्रकाश सान्स्लेशन प्रक्रियेत मदत करते.
कॅरोटीन, रिबोफ्लोवीन, अस्काबिर्क, आम्ल या जीवनसत्वाची निर्मिती करते.
कॅल्शिअम व पोटॅशिअम शोषणाच्या प्रमाणावर परिणाम करते.

जस्त अन्नद्रव्यांचे कार्ये :

पीक पोषक संजीवके तयार करणे.
प्रधीनांच्या निर्मितीस हातभार लावणे.
बी/धान्य प्कव व निर्मिती करते.

लोह अन्नद्रव्यांचे कार्ये :

हे अन्नद्रव्य पिकांना हरितद्रव्य तयार करण्यास मदत करते.
लोहाच्या योग्य पुरवढ्याने पिके इतर अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात शोषून घेऊ शकतात.
लोह बऱ्याच संप्रेरकांचा प्रेरक आहे.

बोरॉन अन्नद्रव्याची कार्ये :

पेशी विभाजन व निर्मिती, पयायाने पिकांची तसेच मुळांची वाढ ह्यात मोठा सहभाग
प्रथिने निर्मिती, बी व मधुर फळांचे निर्माण कार्यात मदत करने.
कॅल्शिअमचे शोषण व वापर यात सहाय्यता करणे.
वनस्पती शर्करेचे वहन करणे आणि पेक्टिन तयार करणे.

मॉलिब्डेनम अन्नद्रव्याचे कार्य :

हवेतील नत्र जमिनीत स्थिर करणाऱ्या जिवाणूच्या वाढीसाठी मदत करणे.
फॉस्फेट तयार करण्यास व क जीवनसत्व तयार करण्यास मदत करणे.

1 tan shenkhatat asnare anndravy ani tyanche fayde
तर शेतकरी मित्रांनो अश्या प्रकारे आपण शेतात टाकत असलेले शेणखता मध्ये कोणकोणते अन्नद्रव्य असतात. आणि त्याचे फायदे काय काय असतात. ते आपण बघितले आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. http://foodietastey. com

तरी आपणास हि सर्व माहिती समजावीत अश्या भाषेमध्ये आम्ही मंडळाचा प्रयत्न केला असून हि सर्व माहिती आपणास समजली असेल अशी अशा करतो आणि हि माहिती तुमच्या काही मित्रांना पाढवावीं जेणेकरून त्यांचा हि फायदा होईल.

तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com या वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा.

1 thought on “1 tan shenkhatat asnare anndravy ani tyanche fayde १ टन शेण खतात असणारे अन्नद्रव्य आणि त्यांचे फायदे”

Leave a comment