pm kisan yojana new GR update पीएम किसान योजनेचा नवीन जीआर काय आहे बदल ?
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे pm kisan yojana new GR update पीएम किसान योजनेचा नवीन जीआर काय आहे बदल ? तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास हवी असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.
शेतकरी मित्रांनो आपण बघत असालच कि दिवसापासून पीएम किसान योजनेच्या एका नवीन जीआर विषयी विचारणा केली जात आहे. प्रत्येकाला हाच एक प्रश्न पडतोय कि काय आहे या नवीन जीआर मध्ये काय आहे, किंवा या जीआर चा काय उद्देश आहे. का शेतकऱ्यांना पुन्हा नवीन काही खाते उघडावे लागणार आहेत का. असे काही प्रश्न शेतकऱ्यांमध्ये पडत आहे.
pm kisan yojana new GR update पीएम किसान योजनेचा नवीन जीआर काय आहे बदल ?
तर याच पर्शवभूमीवरती आपण या ब्लॉग मध्ये त्या जीआर विषयी सखोल माहिती देणार आहोत.मित्रांनो एकंदरीत आपण जर बघीत तर शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देणाऱ्या योजनेची अंमलबजावणी करत असताना महसूल विभागाच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून केली जात होती आणि हीच आता अंमलबजावणी कृषी विभागाकडे देण्यात आलेली आहे. आणि याच पार्शवभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषिअधिक्षकांच्या नवे अकाउंट उघडण्यात यावे साठी या जीआर च्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्या मुळे या योजनेची अम्मलबजावणी करत असताना प्रशासकीय खर्चाची जी तरतूद आहे.
ती तरतूद या खात्यामधून करता येणार आहे. याच्या साठी प्रत्येक जिल्ह्यासाठी म्हणजे अर्थात राज्यातील ३४ जिल्ह्यासाठी ३४ खाते आणि १ सेंट्रलाइज राज्यासाठी १ खात असे काही खाते या जीआर च्या माध्यमातून खोलण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो याच्याच संदर्भातील १७ मे २०२४ रोजीचा जो जीआर आहे.
तर त्या जीआर मध्ये असे आहे कि प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत यांच्यामध्ये आपण पाहू शकता मनरेगा योजनेच्या धरतीवरती या ठिकाणी राज्यशासनाला दोन खाते उघडण्यास मंजुरी देण्यात आलेली होती परंतु या योजनेची अंमलबजावणी करत असताना प्रत्येक जिल्ह्याला प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी कार्यालयांकरिता जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी यांच्या नावे जिल्हा अस्थरावरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी १ अश्या ३४ जिल्ह्यासाठी ३४ स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
याच बरोबर जेकाही अपात्र झालेले लाभार्थी आहे. किंवा जे लाभार्थी यांच्यानंतर अपात्र केले जातंय त्यांच्या कडून वसुली करण्यासाठी यासाठी १ सेंट्रलीज खात राज्यासाठी उघडण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि जे अपात्र लाभार्थी होते यांच्याकडून वसूल केलेला जो काही परतावा आहे. तो परतावा त्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे. अश्या प्रकारे ३५ खाते उघडण्यास या जीआर च्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर या योजनेची प्रशासकीय अंमलबजावणी करत असताना याच्या अंतर्गत कृषिअधिकारी असतील किंवा त्यांच्या बैठका असतील याच्या साठी लागणारा जो खर्च आहे. हा जो काही प्रशासकीय खर्च करण्यासाठीची जी काही तरतूद आहे. हि तरतूद सेप्रेटपणे करण्यासाठी याच्या माध्यमातून निधी वितरण केल्यानंतर त्या खात्यामध्ये निधी वितरन होईल आणि हेच पुढे त्याच्या अंमलबजावणीसाठी हे फायदेशीर ठरणार आहे.
तर मित्रांनो याचा अर्थ असा कि याचा संपूर्ण फायदा प्रशासकीय विभागास होणार आहे. या जीआर चा कुठल्या हि शेतकऱ्यांशी रिलेटेड कुठला हि संबंध नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या समानार्थी कुठला हि गैरसमज करून घेणे गरजेचं नाही तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा जो नवीन जीआर आलेला आहे तो अश्या प्रकारे आहे.
pm kisan yojana new GR update पीएम किसान योजनेचा नवीन जीआर काय आहे बदल ?
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. क्लिक करा
1 thought on “pm kisan yojana new GR update पीएम किसान योजनेचा नवीन जीआर काय आहे बदल ?”