Krushi Paryatan in marathi कृषी पर्यटन एक शेतीपूरक व्यवसाय महिन्याला १.५ लाख पर्यंत आहे उत्पन्न.

Krushi Paryatan in marathi कृषी पर्यटन एक शेतीपूरक व्यवसाय महिन्याला १.५ लाख पर्यंत आहे उत्पन्न.

Krushi Paryatan Ek Shetipurak Vyavsay in marathi
Krushi Paryatan in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

तर मित्रांनो कृषी पर्यटन हा एक शेती पूरक व्यवसाय आहे जो कि आज काल बरेच से शेतकरी या व्यवसायाकडे वळले आहे. कारण कमी खर्चात जास्त उप्तन्न देणाऱ्या व्यवसायांमध्ये हा हि एक व्यवसाय आहे जो कि एक वेळा खर्च केला कि नंतर कोणत्याही प्रकारची लागत लागणार नाही आली उत्पन्न हि भरगोस आहे. तर आज आपण krushipoint.com या ब्लॉग च्या माध्यमातून या Krushi Paryatan in marathi विषयी सखोल माहिती देणार आहोत.

तर मित्रांनो बरेच से शेतकरी अशे आहे कि ज्यांच्या कडे जमीन आहे पण पाणी नाही. तर काही शेतकरी अशे आहे. कि ज्यांच्या कडे जमीन पाणी दोनीही आहेत. पण करायला कोणी नाही. तर अश्या अनेक कारणाने शेकतार्यांना शेती मधील उत्पन्न काढता येत नाही. तर ज्या हि शेतकऱ्यांना शेती मध्ये कोणतेही पीक न लावता उप्तन्न काढायचे असेल तर अश्या शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो कृषी पर्यटन Krushi Paryatan  हि संकल्पना समजायला तशी सोपी आहे. आपल्या मनात असलेले गाव या ठिकाणी आपल्याला भेटते. तर या धकाधकीच्या काळात अवाढव्य, अस्ताव्यस्त पसरलेल्या महानगरातील लोकांना गावाची निसर्गाची ओढ असते. तर कृषी पर्यटनाच्या ठिकाणी नद्या नाले, झाडे, औषधी वनस्पती, धान्यांची भरलेली शेती हे सर्व निसर्ग रम्य वाटेवर या शहरी लोकांना भारावून गेल्यासारखे वाटते.

Krushi Paryatan Ek Shetipurak Vyavsay in marathi
Krushi Paryatan in marathi

1) कृषी पर्यटन केंद्राची वैशिष्ट्ये

१) असे केंद्र उभे करण्यासाठी लागणार खर्च फार मोठा नसून त्यासाठी लागणारा पैसे शहरातून येण्याची गरज नाही.
२) पारंपरिक भारतीय संस्कृतीचे दर्शन, जतन व संवर्धन होण्याची शक्यता आहे.
३) निसर्ग रम्यतेशी संबंधित असल्यामुळे पर्यावरण मैत्रीचे नियम आवर्जून पळाले जातील. शहर व खेड्यातील बांधवांच्या ओळखीतून मैत्रीचा नवा मार्ग निर्माण होईल.
४) संपत्ती व ज्ञानाचा शहराकडून खेड्याकडे प्रवास सुरु होईल.
या सारख्या अनेक काही महत्वाच्या गोष्टी आहे जे कि या व्यवसायामुळे घडून येतील.

तर या व्यवसायासाठी लागणारे काही वस्तू तर सुरुवातीला एक नैसर्गिक छपऱ्यासारखी असणारी झोपडी समोर एक सुंदर मैदान त्या मैदानात काही प्रकारची झाडे त्या झाडांना पूरक पाणी येणाऱ्या पाहुण्यांसाठी रास्ता व काही खुर्च्या मधम टेबल एक किंवा दोन लाकडी पलंग जेवणासाठी लागणारी सर्व भांडी, रात्रीला लाईट, पांघरून, गढ्या, उश्या, अंधारून, सकाळी नाश्त्याची सोया नैसर्गिक हवेसाठी गडद सावली, पिण्याच्या पाण्याची सोया, आकर्षित मेणबत्त्या जेणेकरून रात्रीला पाहुणे बोर होणार नाही, सोबतच मनोरंजनासाठी काही साउंड सिस्टम दोन ते तीन वेळा चहाची सोया सकाळी अंघोळीची सोया, टॉयलेट बाधरुम, या सारख्या अनेक मानवी गरज भागविण्यात मदत होईल अश्या अनेक काही वस्तू जेणेकरून पाहुन्यांना कोणत्याही प्रकारची गरज भासणार नाही याची आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

कृषी पर्यटन केंद्र आहे. पण त्याचे पर्यावरणाशी घट्ट नाते जुळलेले असावे. म्हणजे त्याठिकाणी शक्यतो प्लास्टिक, सनमायक, इत्यादी गोष्टी टाळा. येणारे पर्यटक ते शेतावर येत आहेत याची अधिक जाणीव करून द्यावी. म्हणजे, एअर कंडिशन व स्विमिंग पूल, च्या अभावी ते मोकळ्या मनाने पश्चिमेचा गार वारा व नदीत पोहणे, याचा आनंद लुटू शकतील.

Krushi Paryatan Ek Shetipurak Vyavsay in marathi
Krushi Paryatan in marathi

2) पाहुण्यांचे आदर

तर मित्रांनो आपला जो शेतकरी असतो. त्याची भाषा हि गावठी असते पण आपल्या शेतात काही शहरी पाहुणे येणार आहे याचे भान आपल्याला असावे जेणेकरून आपल्या बोली भाषेमुळे अचानक कोणत्याही प्रकारची इजा किंवा राग पर्यटकाला येणाऱ नाही याची काळजी आपण घ्यावी. व पाहुण्यांच्या समोर आपण आपल्या कामावर असलेल्या माणसांना हि व्यवस्थित हाक करावीत त्यांच्या समोर आपण जर मोठ्या आवाजात बोललो तर अचानक पाहुणे पुढच्या वेळी येणे टाळेल म्हणून बोलीभाषा हा विषय या व्यवसायामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. व तसेच संपूर्ण जागेची स्वच्छता हि खूप गरजेचे मानले जाते.

3) दुसरा महत्वाचा भाग म्हणचे रजिस्टर

आपल्या रजिस्टरमध्ये पाहुण्यांची बुकिंग करतेवेळी काही माहिती लिहून घेणे गरजेचे आहे तर त्या पुढील प्रकारे येण्याचा दिनांक, येण्याची वेळ व वाहतूक व्यवस्था, परतण्याचा दिनांक व वेळ, येणाऱ्या माणसांची संख्या, नाव व मोबाईल नंबर, अपेक्षित आकार व दर, विशेष माहिती व अपेक्षा, येच्याची निश्चिती,या सारख्या बाबी आपण आपल्या रजिस्टर मध्ये नोंद करून ठेवाव्यात.

तर अशे काही बारकावे या व्यवसायात आहेत. तर सुरुवातीला या व्यवसायामध्ये जास्त पैसे दिसत नाही पण काही दिवसांनी या व्यवसायाची वाढ व ओळख होते. व नंतर या व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न वाढू लागते. मात्र आपण नियोजणांचे पालन काटेकोर पाने करणे गरजेचे आहे.

मित्रांनो कृषी पर्यटन हि एक नवीन संकल्पना आहे. पारंपरिक पर्यटनापेक्षा हा थोडासा वेगळा प्रकार आहे. यामध्ये शेतकरी स्वतः च्या शेतावर आलेल्या पर्यटकांना शिकण्याची व मौजमस्ती करण्यासही संधी देतो. कृषी पर्यटन केंदासाठी अगदी अल्प भांडलाची गरज असते. मात्र नैसर्गिक सुंदरता, आकर्षक आखणी व मांडणी, पारंपरिक संस्कृतीचे दर्शन व विविध प्रकारची शेती असणे आवश्यक आहे. या व्यवसायामध्ये पाहुण्यांच्या आदरातिथ्याला सर्वेच्य प्रद्न्य द्यावे लागते. कारण आपण आदरतिथ्य व्यवसायात पदार्पण केलेले असते. पर्यटन व्यवसाय करत असताना वैयक्तिक स्वच्छता तसेच परिसरातील स्वच्छता या कडे कटाक्षाने लक्ष द्यावे. या व्यवसायामध्ये कमी अवधीत वेगवेगळ्या गोष्टीची हाताळणी करावी लागत असल्याने कामाचे नियोजन, सुसूत्रता व एकमेकांमध्ये समन्वय असणे गटारजेचे असते.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

3 thoughts on “Krushi Paryatan in marathi कृषी पर्यटन एक शेतीपूरक व्यवसाय महिन्याला १.५ लाख पर्यंत आहे उत्पन्न.”

Leave a comment