Identification of pests and types of damage on mango fruit trees आंबा या फळ झाडावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार

Identification of pests and types of damage on mango fruit trees आंबा या फळ झाडावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार

Identification of pests and types of damage on mango fruit trees
Identification of pests and types of damage on mango fruit trees
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here      

 

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि त्याने आपल्या शेतीमध्ये लागवड करत असणाऱ्या पिकांना खूप मोठा फायदा होतो. व पिकातील उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे आंबा या फळ झाडावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार (Identification of pests and types of damage on mango fruit trees) तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून कोणत्याही शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल.

तर मित्रांनो या ब्लॉग च्या माध्यमातून आपल्यालाIdentification of pests and types of damage on mango fruit trees आंबा या फळ झाडावरील
किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार

१) या फळ झाडाविषयी आणि यांच्यावरील किडींची ओळख होईल.
२) किडींची करणारी अवस्था कळेल.
३) तसेच या झाडावरील किडींनी केलेल्या नुकसानीचा प्रकार कळेल.

तर मित्रांनो आपण बहुतेकदा किडींचे नियंत्रण किंवा व्यवस्थापन करण्यात काहीच कसर सोडत नाही पण मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम किडीची ओळख असणे हे महत्वाचे आहे. तसेच एकदा त्यांची ओळख पटल्यानंतर त्या किडी कशा पद्धतीने नुकसान करतात हे अभ्यासणे तितकेच गरजेचे आहे. तर मित्रांनो आपण आज आंबा या फळझाडावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार बघूया.

1) किडींचे नाव : तुडतुडे (idioscopus niveosparsus)

किडीची ओळख :
तुडतुडे या किडीची पिल्ले बाल्यावस्थेत रंगाने पांढरी असून पिवळी, हिरवट पिवळी आणि शेवटी हिरव्या करड्या रंगाची होतात. प्रौढ तुडतुड्यांचा पंख असतात. हि कीड आकाराने लहान व पाचरीच्या आकाराची असते. चालताना तिरपे चालते हि तुडतुड्यांची प्रमुख ओळख असते.
नुकसानीचा प्रकार :
प्रौढ व पिल्ले सोंडेद्वारे आंब्यांच्या मोहोराच्या वेळी काळ्या व फुलांमधून रस शोषून घेतात. त्यामुळे कळ्या व फुले आकसतात व गळतात. तुडतुडे रस शोषण करत असताना शरीरातून एक प्रकारचा चिगट व गॉड पदार्थ बाहेर सोडतात. त्यामुळे मोहरावर काळ्या बुरशीची वाढ होऊन मोहोर काळा पडतो. यालाच मोहोर जळला असे म्हणतात, परिणामी फळधारणा होत नाही. व उत्पन्न घटते.

2)खोडकिडा (भिरूड) (Batocera rubus)

किडींची ओळख : प्रौढ भिरूड आकाराने मोठा ५० ते ६० मिमी. लांब असून तो पिवळसर हिरवट रंगाचा असतो. मानेच्या खालच्या भागावर केशरी पिवळसर रंगाचे ठिपके असतात. अळी मोठी व शरीराने भक्कम असून ९ ते १० सेंमी. लांब व १.५ ते २ सेंमी. रुंद असते. अळीचे शरीर मांसल असते. तसेच फिक्कट पिवळ्या रंगाचे असते. अंडी पिवळसर रंगाची असून ती खोडाच्या सालीमध्ये घातली जातात.

नुकसानीचा प्रकार :

अळी प्रथम झाडाची साल नंतर फांद्या व खोड पोखरून छिद्र करते आणि त्या छिद्रामध्ये खात खात पुढे पोखरत जाते. आत पोखरलेला भाग अळीची विष्टा व लाकडाचा भुसा यांनी भरून जातो. बऱ्याचदा हा पदार्थ छिद्रातून बाहेर आलेला दिसतो. यामुळे फांद्या आणि त्यापुढील भागास अन्नपुरवठा होण्यात अडथळा निर्माण होतो त्यामुळे फांद्या वळतात.

किडींचे नाव : पिठ्या ढेकूण (drosicha mangiferae)

किडीची ओळख :
या किडीची पिल्ले व प्रौढ लहान चापटी व दीर्घ वर्तुळाकार असतात. शरीराभोवती चिकट पांढरा रेशमी कापसासारखा पदार्थ असतो. मादीस पंख नसतात, तर नार पिठ्या ढेकणास पंख असतात. हि कीड रंगाने गर्द लाल असून पंख गर्द चॉकलेटी रंगाची असतात. अंडी फेसाळ पदार्थाच्या साहाय्याने जमिनीमध्ये कप्पा करून त्यात घातली जातात.

नुकसानीचा प्रकार :
अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले झाडावर चढतात, नवीन पाने, फळांचे देठावर बहुसंख्येने एकत्रित होऊन रस शेषन करतात. देठामधून रस शोषण केल्यामुळे फळांची वाढ होत नाही, परिणामी ती गळतात. कोवळ्या पानांचीसुद्धा वाढ होत नाही.

किडीचे नाव : फळमाशी (bactrocera dorsalis)

किडीची ओळख :
प्रौढ माशी घरी दिसणाऱ्या माशीसारखी पण आकाराने लहान ५ ते ६ मिमी. लांब असते. माशीच्या शरीराचा पाठीमागील भाग टोकदार व गर्द चॉकलेटी रंगाचा असतो. पंख सरळ लांब असतात. अळ्यांना पाय नसतात. अळी मळकट पांढरी असून १० ते १२ मिमी. असते. अळी तोंडाकडील बाजू निमुळती असते. कोषावस्था जमिनीत असते.

नुकसानीचा प्रकार :
प्रौढ मादी फळात सालच्या खाली अंडी घालते, अंड्यातून बाहेर पडलेली अळी फळातील गरावर उपजीविका करते. फळमाशीने फळावर केलेल्या छिद्रातून रोगजंतू फळामध्ये प्रवेश करतात, परिणामी प्रादुर्भाव झालेली फळे सोडायला व गळायला सुरुवात होते. अळ्या तापमानानुसार १० ते २० दिवसांमध्ये १५ सेमी. खोल जमिनीमध्ये कोषावस्थेत जातात.

Identification of pests and types of damage on mango fruit trees
Identification of pests and types of damage on mango fruit trees

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. क्लिक करा

Identification of pests and types of damage on mango fruit trees आंबा या फळ झाडावरील किडींची ओळख व नुकसानीचा प्रकार
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार….

Leave a comment