gengar farming techniques in marathi आले शेतीमधून एकरी १५० कुंटल हुन जास्त उत्पन्न
अजून माहिती साठी येथे क्लिक करा pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman पिकांवर रोग येण्यासाठी आवश्यक असणारे हवामान
gengar farming techniques in marathi आले शेतीमधून एकरी १५० कुंटल हुन जास्त उत्पन्न
तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत.आले लागवड पद्धती (gengar farming techniques) विषयी सखोल माहिती. तरी आपण संपूर्ण माहिती अचूक पने वाचावी अशी आपणास विनंती जेणेकरून तुम्हाला त्या विषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही.तर आज ची बातमी तुमच्या साठी खास राहणार आहे. तर मोत्रांनो आपण आजच्या लेखातून एका खास आयुर्वेदिक (अद्रक) लागवड विषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे krushi point या वेबसाईट वर तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या एका tool वर तर बघूया आले लागवड विषयी संपूर्ण पूर्ण माहिती. चला तर मंग या शेती ची पुरेपूर माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत.
तर मित्रांनो आपण आज या आले लागवड शेती मध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती घेणार आहोत. तर आले लागवडीसाठी जमीची निवड, पूर्वमशागत, बियाण्याची निवड, बीजप्रक्रिया, आल्याच्या जाती, लागवडपद्धती, खतव्यवस्थापन, अंतर मशागत, व पाणी व्यवस्थापन या विषयी सखोल माहिती आपण आज या
(gengar farming techniques in marathi) ब्लॉग च्या माध्यमातून आपण घेणार आहोत.
तर मित्रांनो आज च्या घडीला शेती क्षेत्रामध्ये लाखोंचे उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाणारे एकमेव आले शेती हि आहे. तर मित्रांनो हि माहिती आपण पूर्ण वाचावी अशी विनंती.
सुरुवातीला आपण बघणार आहोत जमिनीची निवड कशी करावी.
credited to youtobe baliraja special channel
जमिनीची निवड :
आले पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी पण बारमाही असलेली हलकी हे माध्यम भुसभुशीत जमीन आपण निवडावी त्या जमिनी मध्ये हरळी, लव्हाळी, या सारख्या तणांपासून हि जमीन मुक्त असावी. ज्या ठिकाणी गाळाची जमीन आहे अश्या ठिकाणी आले लागवड आपण करावी. व ज्या जमीचा पीएच ७ ते ८ च्या दरम्यान असतो. अश्या जमिनीत हे पीक उत्तम येते. तर आल्याच्या लागवडीस हलकी ते माध्यम स्वरूपाची परंतु पाण्याचा निचरा उत्तम होणारी , रेतीयुक्त, भुसभुशीत व हवा खेळती राहणारी जमीन योग्य आहे. अशे मानले जाते.
हवामान :
आले शेतीस उष्म व दमात हवामान पोषक असून उगवणीसाठी उष्ण हवामान अतिशय उपयोगी आहे. महाराष्ट्रात आल्याची लागवड अक्षयतृतीयेच्या आसपास (एप्रिल ते मी ) महिन्यात केली जाते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आल्याची लागवड करण्यात हरकत नाही आल्याच्या पिकास उष्ण व दमट हवामान गरजेचे असते. लागवड करण्यापूर्वी जमीन एप्रिल ते मी महिन्यात ३० अंश से. ग्रे ते ३५ सें.ग्रे. तापमान उग्वमीस अनुकूल असते.
पूर्व मशागत :
आले हे जमिनीत वाढणारे पीक असल्यामुळे जमीनीची चांगली मशागत करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी मार्च / एप्रिल महिन्यापासून पल्टी फाळाने ९ ते १० इंच खोल उभ्या आडव्या २ ते ३ नांगरणी करण्यात याव्या. नंतर चांगले बारीक ढेकळे फोडून घ्यावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत जमिनीवर पसरून वखरणी करून जमिनीत मिस्क करून घ्यावे. त्यानंतर ब्रेड पडून घ्यावेत, नंतर तुमचे शेत लागवडीसाठी तयार झालेले असतील.
आले बियाण्याची निवड :
तर मित्रांनो सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आले बियाण्याची निवड हा आहे कारण आल्याच्या लागवडीसाठी रोग व किडमुक्त बेणे प्लॉटमधून बियाणाची निवड करावी. बियाणे (कुडी/कंद) ५ से. मी. आकाराचे व २५ व ३० ग्रा. वजनाचे असावे. व लागवडीसाठी आले बियाणे हे रसरशीत व दर्जेदार असावे. व त्यांना खात्रीशीर ठिकाणाहून निरोगी १ ते २ डोळे असलेले २५ ग्राम वजनाचे बेणे घ्यावे. बियाणे दर्जेदार असेल तर उगवण क्षमता अधिक असते. उत्पन्नामध्ये वाढ होते.
बीज प्रक्रिया :
तर मित्रांनो बियाणे काढणी नंतर ४० ते ४५ दिवसाने आले बियाण्याची लागवड करावी लागेते. तर लागवडीच्या वेळी बीजप्रक्रिया करूनच लागवड करावी. त्यामध्ये परधाम निम ऑईल किंवा कडुलिंब अर्क त्यानंतर त्यामध्ये असलेले डोळे नसलेले कंद काढून टाकावेत, तसेच आले कंद पोकळ असेल तर ते कंद हि वेगळे करावेत. त्यानंतर लागवडी वेळी बुरषीनाषकांमधून बियाणे काढूनच मंग च लागवड करावी
अजून माहिती साठी येथे क्लिक करा. http://foodietastey. com
सुधारित जाती :
देशात सध्या आल्याच्या पुष्कळ जाती असून स्थानिक विभागानुसार त्यांना मलबारी, हिमाचल, कोचीन, आसामी, अशी नवे आहेत. परंतु ओल्या आल्याचे हेकतरी उत्पादन, सुठेचे प्रमाण, ओली ओरीनचे प्रमाण व तंतुमय घटक यांचा तुलनात्मक भ्यास करून आल्याच्या सुधारित जाती निवड पद्धती प्रसारित सरण्यात आल्या आहेत. अधिक उत्पन्न तेनाऱ्या व रोगकिडीस प्रतिकारक अशा महत्त्वाच्या आल्याच्या जाती पुढील प्रमाणे
१) नाडिया
२) थिंगपुरी
३) मारन
४) रिओ डी जनेरिओन
५) सुप्रभा
६) माहीम
७) जमैका
८) कोचीन
९) जपानी
१०) जी -५५
अश्या प्रकारे सुधारित जाती आपण बघू शकतो.
लागवड पद्धती :
भारतात लागवडीसाठी असलेले हे एक महत्त्वाचे आणि दररोज आहारात वापरले जाणारे मसाल्याचे पीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये आल्याची प्रामुख्याने सातारा, रायगड, ठाणे, पुणे, या जिल्ह्यात लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच मराठवाड्यात जळगाव, बोदवड, चाळीसगाव, छ. संभाजीनगर , जालना, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, या सारख्या अनेक ठिकाणी या पिकाची लागवड होते. तर मित्रांनो आपण लागवड करायची ठरली तर ब्रेड पद्धत म्हणजेच सपाट वाफा पद्धत ने लागवड करणे योग्य आहे. २ बाय १ किंवा २ बाय ३ मीटर अंतराने सपाट वाफे तयार करावे. वाफ्यात २० बाय २० सें. मी. अंतरावर कंदाची लागवड करावी. कंद जमिनीत ५ सें. मी. खोलीवर लावून लागलीच त्यावर पाय द्यावे. अश्या पद्धतीने आपण आले लागवड करू शकतो.
आले पिकासाठी खत व्यवस्थापन
आल्याचे पीक सेंद्रिय खतास उत्तम प्रतिसाद देते. या साठी चांगले कुंजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० टन या प्रमाणे द्यावे. त्यानंतर आले पिकासाठी वाढीच्या प्रमाणे आपण खताची मात्र ठेवू शकतो. त्यामध्ये आपण विद्राव्य खताची मात्रा जास्त ठेवावीत. व लागवडीपासून तर काढणी पर्यंत १० ते १५ दिवसाच्या अंतराने आपण विद्राव्य खाते आले पिकासाठी देऊ शकतो. मंग तो कंद तयार होण्या अगोदर असो किंवा कंद तयार झाल्यावर तर कंद काढणीच्या अगोदर १ महिना आपण खाते देणे बंद करावीत.
अंतर मशागत
तर मित्रांनो अंतर मशागतीचा जर विचार केला तर आले पिकासाठी निंदणी हा त्याचा प्रमुख प्रकार आहे असे आपण म्हणू शकतो. तसेच आले लागवडीनंतर ब्रेड ला माती लावने, म्हणजे भर देणे , तसेच आपण यामध्ये अंतर पीक हि घेऊ शकतो.
पाणी व्यवस्थापन पद्धती
तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन विषयी जर सांगायचं झालं तर आपण आले पिकासाठी तुषार सिंचन, आळवणी पद्धती व ठिबक सिंचन पद्धती अशा पद्धती ने आपण आले पिकासाठी पाण्याची व्यवस्था करू शकतो.
gengar farming techniques in marathi आले शेतीमधून एकरी १५० कुंटल हुन जास्त उत्पन्न
तर मित्रांनो आले शेती हि एम नवीन संकल्पना म्हणून ओळखली जाते तर महाराष्ट्रात च नवे तर प्रदेशात हि मोठ्या प्रमाणात आले आले शेती केली जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे हि एक औषधी वनस्पती म्हणून हि याचा वापर केला जातो. म्हणून या पिकाला आपल्या देशातच नवे तर परदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती साठी आजच आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा. संपूर्ण ब्लॉग वाचल्या बहाद्दर धन्यवाद krushipoint.com आपला आभारी राहील.