tomato farming in marathi टोमॅटो शेती मध्ये शेतकरी काढताय लाखोंचे उत्पन्न

tomato farming in marathi | टोमॅटो शेती मध्ये शेतकरी काढताय लाखोंचे उत्पन्न

तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत. टोमॅटो शेती विषयी सखोल माहिती. तरी आपण संपूर्ण माहिती अचूक पने वाचावी अशी आपणास विनंती जेणेकरून तुम्हाला त्या विषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही.तर आज ची बातमी तुमच्या साठी खास राहणार आहे. तर मोत्रांनो आपण आजच्या लेखातून एका खास फळभाजी शेती विषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे krushi point या वेबसाईट वर तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या एका tool वर तर बघूया टोमॅटो शेती विषयी संपूर्ण पूर्ण माहिती. चला तर मंग या शेती ची पुरेपूर माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत.

tomato farming techniques in marathi
tomato farming in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या सारख्या माहिती साठी येथे क्लिक करा click here

या ब्लॉग च्या माध्यमातून आपणस कोणकोणत्या विषयी माहिती मिळू शकते असं सांगायाच झालं तर कि शेती करताना मातीचा पोत हवामानाचा अंदाज कोणतं पीक लावायचं याचा योग्य निर्णय पावसाचा अंदाज कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनाची योग्य माहिती या सर्व गोष्टींबद्दल चे प्रश्न आपल्याला पडलेले असतात त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारी एक भन्नाट वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे krushi point.com तर मित्रांनो आपण आज या ब्लॉग मध्ये टोमॅटो च्या शेती बद्दल सर्व बारकावे बघणार आहोत. आणि टोमॅटो शेती साठी लागणारे हवामान , जमीन , खातव्यवस्थापन, पाणीव्यवस्थापन, कीडनियंत्रण, लागवड पद्धती, काढणी, आणि विक्री या सारखी संपूर्ण माहित आपण आज या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

टोमॅटो एक असं फळपीक जे इतर कुठल्याही फळपिकापेक्षा जास्त भाजी साठी वापरलर जाते. टोमॅटो पियूरी
टोमॅटो सॉस अशा विविध पदार्थांसाठी ह्या फळ पिकांचा सर्वाधिक वापर केला जातो. म्हणून महाराष्ट्रात अंदाजे तब्बल 29 हजार 190 हेक्टर जमीन टोमॅटोच्या लागवडीखाली आहे. नाशिक पुणे सातारा अहमदनगर नागपूर सांगली या शहरांमध्ये टोमॅटो सर्वाधिक पिकवला जातो भारतीय शेतीमध्ये टोमॅटो एक प्रमुख फळपीक आहे.

त्याच्यात असलेल्या अ, ब, आणि क जीवनसत्वामुळे आणि खनिज व लोह यांनी भरपूर असल्यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्त्व सर्वांनीच ओळखले आहे.
आज आपण जाणून घेणार आहोत याच टोमॅटोच्या लागवडीबद्दल संपूर्ण माहिती टोमॅटोच्या लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी असावी लागते हलक्या जमिनीतही टोमॅटोची लागवड करता येते पण त्यासाठी सेंद्रिय खताचा पुरवठा जास्त प्रमाणात करता यायला हवा. आणि पाण्याची नियमित उपलब्धता असावी जमिनीचा सामु ६ ते ८ इतका असावा लागतो.

टोमॅटो ची लागवड खरीप हंगामात जून जुलै दरम्यान केली जाते तर रब्बी म्हणजेच हिवाळी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात बी पेरणी केली जाते आणि उन्हाळ्यासाठी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात बी पेरणी केली जाते पूर्व मशागत करताना जमिनीत आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावेत आणि मग वखारणी करावी. 30 ते 40 गाड्या शेणखत जमिनीत व्यवस्थित मिसळावे. लागवडीसाठी दोन ओळींमध्ये अंतर ६० ते ९० सेंटीमीटर असावे तर दोन रोपांमधील अंतर 45 ते 60 cm इतकी असावे पावसाळ्यात आणि हिवाळ्यातील लागवड ९० बाय ६० सेंटिमीटर अंतरावर करावी तर उन्हाळ्यातली लागवड 60 बाय 46 cm ह्याप्रमाणे करावी टोमॅटो लागवडीसाठी देशभरात अनेक वाढ प्रशालित आहेत पण महाराष्ट्राच्या मातीच्या हवामानाच्या अंदाजानुसार काही विशिष्ट वान निवडले गेले आहेत ते पाहूया.

tomato farming in marathi टोमॅटो च्या जाती

पुसा गौरव
पुसा रुबी
अर्का गौरव
पुसा शितल
रोमा
रुपाली
वैशाली
भयश्री
अर्क विकास
पुसा अर्ली
डवार्फ

पुसा गौरव
एखाद्या झुडपा सारखी वाटणारी ही जात आहे तिच्यावर येणारी फळे चपटी लाल असतात आणि हिच्या लागवडीने हेक्टरी 350 इतके उत्पन्न मिळते.

पुसा रुबी
वर्षातल्या तीनही हंगामात लागवड करता येण्यासारखी जात आहे. तिला येणारे टोमॅटो गर्द लाल रंगाचे असतात. हिच्या लागवडीने हेक्टरी ३२५ क्विंटल इतके उत्पादन मिळू शकते.

अर्का गौर
पुसा गौरव सारखीच असणारी हि जात आहे. फळे गर्द लाल पण जास्त टिकवू असून हिच्या लागवडीनं 350 इतके उत्पादन मिळू शकते हे विशेषतः हिवाळी हंगामात उत्तम उत्पन्न देणारी जात आहे. तिला लागणारी फळे लाल रंगाची आणि संपूर्ण गोल आकाराची असतात. हिच्या लागवडीनं हेक्टरी 350 क्विंटल इतके उत्पन्न मिळते.

रोमा
झाडे लहान आणि झाडूपाळ असून फळे आकारांना लांबट आणि जाड साल असल्याने वाहतुकीस योग्य आहे. हेक्टरी उत्पादन 25 टन एवढे आहे.

रूपाली वैशाली पुसा शितल इत्यादी जातीची ही लागवड केली जाते.

tomato farming in marathi लागवड पद्धती

टोमॅटोची रोपे गादीवाफ्यावर तयार केली जातात त्यासाठी जमिनीची खोल नांगर देखील केली जाते नंतर कोळव्याच्या दोन ते तीन पाळ्या घेऊन जमीन भुसभुशीत करून घेतली जाते. गादि वाफ हा १ मीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर लांब आणि उंचीला पंधरा सेंटीमीटर होईल अशा पद्धतीने तयार केला जातो.
त्यात एक मोठे घमेले शेनखत आणि पन्नास ग्राम सफूला मिसळून वाफा हाताने सपाट केला जातो. मग बियांची पेरणी केली जाते.

पेरणीपूर्वी थायरम बुरशीनाशक औषध यांना चोळावे बीयांची पेरणी गादीवाफ्याच्या रुंदीला समांतर अशा रेघा बोटाने पाडून त्यात बी टाकून ती मातीने झाकून दिली जाते वाफ्यांना या काळात पाणी देताना झारीन पाणी द्यावे लागते दहा ते बारा दिवसांनी जेव्हा बी उगवलेले असते तेव्हा दोन ओळ्यांमध्ये काकरी पाडून प्रत्येक वाफ्यास १० gm इतके फोरेट दिले जाते वाफ्यांनवरती तणांची वाढ होणार नाही याची अशा वेळी काळजी घ्यावी.

फुल किडे आणि करपा रोगाच्या नियंत्रणा करिता दहा लिटर पाण्यात १२ ते १५ मिली मोनोक्रोटोफॉस आणि २५ ग्राम एम ४५ मिसळून बी उगवल्या नंतर पंधरा दिवसांनी फवारावे नंतरच्या दोन फवारण्या दहा दिवसाच्या अंतराने कराव्यात बी पेरणी बसून 25 ते 30 दिवसांनी म्हणजेच साधारणतः रोपे बारा ते पंधरा सेंटीमीटर उंचीची झाल्यावर रोपाची सरी वरंब्यावर पूर्ण लागवड करावी रोपांच्या पुनर लागवडीसाठी रोपे उपटण्याच्या एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे त्यामुळे मुळांपासून रोपे काढणे सोपे होते आणि अर्धी मुळे जमिनीत रुतून राहत नाही पुनर लागवड करताना कमी उन्हात किंवा शक्यतो संध्याकाळी करावी.

tomato farming in marathi खात व्यवस्थापन

खतांची मात्रा सरळ वानांनसाठी २००, १००, १००, आणि संकरित वाणांसाठी ३००, १५०, १५०, अनुक्रमे नत्र स्फुरद पालाश अशा पद्धतीने द्यावे यातला निंबा नत्र लागवडीच्या वेळी आणि उरलेला लागवडीनंतर ४० दिवसांनी द्यावा पाण्याचे नियोजन करताना रोपांच्या लागवडीनंतर तीन ते चार दिवसांनी आणि नंतर आठ ते दहा दिवसांनी दुसऱ्यांदा पाणी द्यावे पावसाळ्यात आठ ते दहा दिवसांनी तर हिवाळ्यात पाच ते सात दिवसांनी पाणी द्यावे उन्हाळ्यातील ते चार दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे फुले आलेली असताना पाण्याचा नियमित पुरवठा असायला हवा नाहीतर फुल गळाची समस्या होते. पाणी ठिबक सिंचनाला दिले तर 50 टक्के पाण्याची बचत होऊन उत्पन्नात 40% वाढ होते शेतात खुरपणी करताना तनांचा बंदोबस्त करावा पण हे करताना मुलांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

tomato farming techniques in marathi
tomato farming in marathi

 

या सारख्या माहिती साठी येथे क्लिक करा. click here

tomato farming in marathi  झाडे बांधणी.

टोमॅटोच्या झाडांचे खोड आणि फांद्या बारीक असल्यामुळे ते कमकुवत असतात. त्यामुळे त्यांना फळ लागली कि ते जमिनीकडे झुकतात. त्याने फळांला बुरशी कीटक लागण्याचा धोका असतो तसेच बऱ्याच समस्या उद्भवतात यासाठी या झाडांना आधार देऊन वाढवणे गरजेचे आहे झाडांना समांतर दीड ते दोन मीटर लांबीची पट्टी जमिनीत ठोकून किंवा तरेन झाडांना आधार दिला जातो. फळांना बुरशी लागत नाही. तसेच झाडांना आधार दिल्यामुळे फळाची आणि फांद्याची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळे पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी संपर्क येत नाही. त्यामुळे फळे सोडण्याचे आणि रोगांचे प्रमाण कमी होते. खाते फवारणी करणे, फळांची तोडणी करणे. इत्यादी कामे सुलभतेने करता येतात.

tomato farming in marathi फवारणी आणि विक्री

टोमॅटो वर करपा हा रोग प्रामुख्याने पडतो करपा हा रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो रोगामध्ये पाणी देठ खोड यावर तपकिरी गुलाबी ठिपके पडतात त्यावर उपाय म्हणून डायथेन एन ४५, हे १० लिटर पाण्यात २५ ते ३० ग्राम त्या प्रमाणात मिसळून फवारावे. तर फवारणी दर दहा ते पंधरा दिवसाने करावी.

फवारणी अगोदर पूर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे तोडावी परंतु बाजारासाठी लागणारी फळे निम्मी लाल तर निम्मी हिरवी अशा प्रकारे करावी फळांची तोडणी श्यक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी च करावी. तोडणी अगोदर ३ किंवा ४ दिवस अगोदर फवारणी झालेली असावी. काढलेली फळे सावलीत ठेवावी आणि त्याच्या आकार नुसार वर्गवारी करावी आणि नंतरच बाजारात घेऊन जावी.
तर मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच नवनवीन शेती विषयी माहित घेऊन आम्ही येणार आहोत धन्यवाद.

 

1 thought on “tomato farming in marathi टोमॅटो शेती मध्ये शेतकरी काढताय लाखोंचे उत्पन्न”

Leave a comment