vertical farming in marathi कशी करतात कमी जागेत आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे शेती होईल ४० ते ५० पट उत्पन्नत वाढ.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here
तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (vertical farming in marathi) कशी करतात कमी जागेत आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे शेती होईल ४० ते ५० पट उत्पन्नत वाढ.
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.
तर मित्रांनो दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे बऱ्याच ठिकाणी शेतजमिनीची कमतरता होऊ लागल्याचं आपण बघतो. कित्येक ठिकाणी तर टेसेस वर म्हणजे गच्चीवर तसेच बाल्कनीमध्ये विविधप्रकारे भाजीपाला आणि इतर गोष्टी पिकवताना बरेच लोक आपल्याला दिसून येतात. मेट्रो सिटी मध्ये शेतीला पूरक जमीन कमी असते. तर काही ठिकाणी शेतकरी अल्पभूधारक असतो. अश्या परिस्थितीमध्ये vertical farming हि प्रणाली फायदेशीर ठरू शकते. vertical farming हा प्रश्न तर प्रत्येकाला पडलेला असेलच तर मित्रांनो vertical farming म्हणजे उभी शेती. मित्रांनो सपाट आणि पसरत जमिनीमध्ये आपण करतो ती पारंपरिक शेती, पण कमी जागेत नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे एकावर एक थरांचा नियोजन करून केली जाते हि म्हणजे (vertical farming) उभी शेती.
सध्या vertical farming मध्ये मुख्यतः हळदीचं उत्पन्न घेतलेलं बघायला मिळत. vertical farming मध्ये येणार हळदीचं दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत. चला तर मित्रांनो अधिक विस्तृत प्रकारे जाणून घेऊया vertical farming उभी शेती.
तर मित्रांनो vertical farming उभी शेती हि पारंपरिक शेती पेक्षा वेगळी आहे. कि याच्या मध्ये आपल्याला जागा निर्माण करून जास्तीत जास्त प्लांट पॉप्युलेशन आपण या मध्ये बसवू शकतो. आणि विशेष म्हणजे आपल्याला नांगरणी, खुरपणी, आणि कोळपणी यांची आवश्यकता नाही आहे. कारण कि हि शेती एक पॉलिहाऊस मध्ये असल्यामुळे गवत वगैरे होत नाही. आणि दुसरा म्हणजे कोणत्याही रोग अटॅक या मध्ये खूप कमी प्रमाणात होतो. नाही होत असं म्हटलं तरी चालेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here
vertical farming मध्ये वापरल्याजाणारी माती vertical farming in marathi कशी करतात कमी जागेत आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे शेती होईल ४० ते ५० पट उत्पन्नत वाढ.
तर मित्रांनो vertical farming मध्ये आपण लाल माती वापरू शकतो. कारण लाल माती हि काळ्या माती पेक्षा हि खूप भुसभुशीत असते. आणि दुसरा फायदा म्हणजे जर आपल्याकडे पाणी जरी कमी असले तरी ती माती घट्ट किंवा कडक होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ती माती कडक होऊ नये म्हणून त्यामध्ये आपण शेणखत वापरू शकतो. त्याचा हि खूप मोठ्या प्रमाणात या शेतीला फायदा आहे. त्याच बरोबर कोकोपीट कॅम्पोजिशन हि आपण त्यामध्ये वापरू शकतो ज्यामुळे ती माती भुसभुशीत राहील. आणि त्यांचे जे रायजोंम आहे त्यांची जमिनीमध्ये ग्रोथ होईल.
vertical farming मध्ये कसे असते रोगराई आणि किडींचे नियोजन
तर मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे या मध्ये रोग राई आणि कीड होतच नाही. कारण कि पॉलिहाऊस मध्ये असल्यामुळे पाऊस आपण देणार असलेलं पाणी पूर्ण आपण मेंटेन मध्ये ठेवावं लागत आणि ह्युमिनीती तापमान मेंटेन असेल तर त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होताच नाही.
vertical farming मध्ये झाडांना कसे मिळतात पोषक द्रव्य
तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघितलं आहेतच कि लाल माती या शेती साठी कश्या प्रकारे योग्य असते. तर ज्या वेळेस आपण सुरुवातीला माती घेतो त्यावेळेस त्या मातीचे माती परीक्षण करून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे होते असे कि आपल्या मातीला कशाची गरज जास्त आहे म्हणजे कोणत्या रासायनिक खताची गरज जास्त आहे. किंवा कोणते खत सोडू नये हा फायदा आपल्याला माती परीक्षण केल्यामुळे होत असतो. आणि मंग आपण आपल्या पिकाला पाहिजे तो अन्न घटक सोडू शकतो. त्यामुळे योग्य ते पोषक द्रव्य झाडांना मिळतात.
vertical farming नैसर्गिक आपत्तीनपासून कस करावं पिकांचं रक्षण
तर मित्रांनो आपले पीक हे पॉलीहाऊस मध्ये असल्यामुळे यामध्ये नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण खूप कमी असते. जसे कि काही ठिकाणी जास्त पाऊस होतो आणि त्यामुळे जमिनीवर पाणी तुंबून असते आणि पाणी तुंबून असल्याकारणाने झाडांची मर होते. ताश्याप्रकारे होणारे परिणाम या शेतीमध्ये होत नाही.
vertical farming करताना काय घ्यावी काळजी.
तर शेतकरी मित्रांनो vertical farming मध्ये काळजी घेण्याचे म्हटले तर त्या ट्रे मध्ये वापस कॅन्डिशन बघावी लागती जेणेकरून कोणत्या ट्रेमध्ये पाणी पडत आहे. किंवा नाही किंवा पाणी जर जास्त झालं असेल तर ते हि जास्त व्हयला नको. तर यासाठी आपण प्रत्येक ट्रे जवळ जाण्यासाठी एक शिडी चा वापर करू शकतो.
vertical farming कोण आणि कस करू शकतो.
तर मित्रांनो एक बघायचं झालं तर vertical farming करणे हि एक काळाची गरज झालेली आहे. त्याला एक महत्वाचे कारण म्हणजे लोकसंख्येत होणारी वाढ आणि जमिनीची होणारी घट कारण लोकसंख्या तर खूप तेजीने वाढताना आपल्याला दिसून येईल मात्र जमीन तर आधी होती तितकीच आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळेच पर्यायी vertical farming करणे गरजेचे झालेले आहे.
vertical farming का करायला हवी आणि काय आहे फायदे
तर मित्रांनो vertical farming या शेतीमुळे फायदे जर आपण बघितले तर यामुळे ८० ते ८५ टक्के पाण्याची बचत होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल अश्या शेतकऱ्यांनी vertical farming करायला हवी. सोबतच कमीत कमी ४० ते ५० पटीने उत्पन्नत हि वाढ होते. जर आपण एक एकर हळदीचे पीक लागवड केले तर त्यातून आपल्याला ४० एकर एवढे उत्पन्न होते तर का नाही करावी आपण vertical farming
vertical farming in marathi कशी करतात कमी जागेत आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे शेती होईल ४० ते ५० पट उत्पन्नत वाढ.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार..