vij bill mafi maharashtra 2024 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

vij bill mafi maharashtra 2024
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

vij bill mafi maharashtra 2024 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
vij bill mafi maharashtra 2024 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे vij bill mafi maharashtra 2024 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.

शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन योजने विषयी माहिती बघणार आहोत. आणि हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. तर शेतकरी मित्रांनो बघूया सविस्तर माहिती. आणि काय आहे. या योजनेचे स्वरूप.
सध्याच्या जागतिक हवामानातील बदल आणि नैसर्गिक पावसातील अनियमिततेमुळे राज्यातील शेती व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून संपूर्ण शेतकरी बांधवांना धीर म्हणून राज्य शासन काहींना काही असते. या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने २५ जुलै २०२४ रोजी जो शासन निर्णय काढला होता. ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ आता अमलात आणली आहे.

vij bill mafi maharashtra 2024 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज अशा प्रकारे वीज शेतकऱ्यांना दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाने राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या मोटारांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. यासाठी साधारण 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

या योजनेचा कालावधी. vij bill mafi maharashtra 2024
 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना फक्त पुढील येणाऱ्या ५ वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु 3 वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणजेच पुढील काही वर्ष हि योजना राबण्याची आहे किंवा नाही या गोष्टीचा आढावा घेण्यात येणार आहे.

या योजनेसाठी कोण असेल पात्र

राज्यातील 7.5 अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. अशी तरतूद सरकारने या जीआर मध्ये केलेली आहे.

कशी आहे या योजनेची अंमलबजावणी

एप्रिल 2024 पासून 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे.
शासनास विद्युत अधिनियम 2003, कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

सध्या देण्यात येणारी वीजदर सवलत रुपये 6 हजार 985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7 हजार 775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्षी रु. 14 हजार 760 कोटी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे.
या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याचे धोरणदेखील शासनाकडून ठरविण्यात आले आहे. ही योजना राबविण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे. असे देखील या मध्ये नमूद केलेले आहे.

vij bill mafi maharashtra 2024 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

1 thought on “vij bill mafi maharashtra 2024 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना”

Leave a comment