chia seeds farming in marathi काय आहे चिया शेती ? एकरी उत्पन्न आहे ५ ते ६ लाखांपर्यंत
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन संकल्पेनविषयी माहिती बघणार आहोत. तर सध्या आपण बघत आलेलो आहोतच कि आज च्या काळात पारंपरिक शेतीला नवी पर्यायी शेती सध्या शेतकरी करताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच प्रकारे चिया शेती सुद्धा आज आपल्या भारतात बऱ्याचश्या राज्यांमध्ये शेतकरी करत आहे. आपल्या साठी हि शेती एक नवीन प्रयोग ठरू शकतो. कारण चिया बियाणे हे आपल्या देशात नवे तर बाहेरील देशातील पीक आहे. त्यामुळे या पिकाचे एकरी उत्पन्न बघता भारत सरकारने जे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ठरवलेले आहे. आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी चिया बियाण्यासारखी पिके यामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात.
तर शेतकरी मित्रांनो आपण या ब्लॉग च्या माध्यमातून चिया शेती विषयी पुढील माहिती बघणार आहोत. ती म्हणजे या बियाण्याची लागवड पद्धती, त्याचबरोबर पाण्याचे व्यवस्थापन, खत आणि कीडव्यवस्थापन, अपेक्षित उत्पन्न, लागणार खर्च आणि विक्री या विषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
लागवड पद्धती chia seeds farming in marathi काय आहे चिया शेती ? एकरी उत्पन्न आहे ५ ते ६ लाखांपर्य
तर शेतकरी मित्रांनो आज आपण चिया शेती विषयी जी माहिती बघणार आहोत त्यातील लागवड पद्धती म्हणजे खूप महत्वाची आहे. तर शेतकरी मित्रांनो चिया शेती खूप सोपी आणि सरळ आहे. त्याची लागवड आपण दोन प्रकारात करू शकतो. ती म्हणजे बियाणे लागवड पद्धती आणि दुसरी म्हणजे रोपे तयार करून रूपांची लागवड पद्धती. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला जमिनीची चांगल्या प्रकारे नांगरट करून घ्यायची आहे. त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण या पिकाची लागवड करू शकतो. तर आपण बियाणे जमिनीत फेकून लागवड करत असू तर त्यासाठी आपल्याला १ ते २ किलो पर्यंत बियाणे लागते. तर आपण ज्यावेळेस बियाण्याची नर्सरी मध्ये लागवडकरून त्यांचे रोपे तयार करून घेतले आणि त्यानंतर आपण लागवड केली तर आपल्याला दोन फायदे आहे. ते म्हणजे लागवडीपूर्वी रोपांची वाढ चांगल्या रित्या होते.
तर दुसरा फायदा बियाण्याची कमीत कमी खप होते. त्यासाठी आपण रोपे तयार करून ज्या प्रकारे आपण भात लागवड करतो त्या प्रकारे आपण चिया पिकाची लागवड करू शकतो. आणि अश्या प्रकारे जर आपण लागवड केली तर कमीत कमी अर्धा किलो एवढेच बियाणे आपणास लागवडीसाठी लागू शकतात.
चिया बियाणे पिकाची लागवड आपण मध्यम हवामान असणाऱ्या भागातच करू शकतो. कारण थंड हवामान आणि डोंगराळ भाग वाघळता संपूर्ण भारतात त्याची लागवड आपण करू शकतो. त्याच प्रमाणे आपण या पिकाची लागवड लाल किंवा तपकिरी रंगाच्या किंवा ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होतो अश्या जमिनीमध्ये आपण या पिकाची लागवड करू शकतो. आणि प्रामुख्याने जर बघितले तर या चिया बियाणे पिकाची लागवड आपण ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातच केली पाहिजे कारण या पिकाला पूरक हवामान या दोन महिन्यात योग्य मानले जाते.
खत आणि कीडव्यवस्थापन
तर शेतकरी मित्रांनो आपण बघितले तर या पिकाला जवळ जवळ कोणत्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत नाही. पण तरी सुद्धा एखादी कीटकनाशक फवारणी आपण घेऊ शकतो. त्याच बरोबर या चिया बियाणे पिकाला लागवडीनंतर एकवेळा युरिया या खताचा डोस आपण देऊ शकतो. त्या नांतर आपण बघिलते तर या पिकाला जंगली प्राण्याचा कोणत्या प्रकारची हानी होत नाही. कारण या पिकाच्या पानांवर केस वाढलेले असतात. आणि त्यामुळे या पिकाला कोणत्याही प्रकारचे वन्य प्राणी किंवा पाळीव प्राणी कोणत्याही प्रकारचे नुकसान करत नाही.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
अपेक्षित उत्पन्न
तर मित्रांनो या चिया बियाणे पिकाची शेती तर आपल्या भारतात बरेचसे शेतकरी करताना आपल्याला दिसून येतील मात्र या शेतीतील उत्पन्न माहिती करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जर उत्पन्न जास्त असेल तरच आपण हि नाही तर कोणती हि शेती करू शकतो. त्यासाठी या चिया बियाणे पिकाची विक्री केल्यानंतर आपल्याला यातून तयार होणारे बियाणे विक्री करावे लागतात. तर मित्रांनो या चिया बियाण्याच्या शेतीतून आपल्याला एकरी ५ ते ६ क्विंटल एवढे उत्पन्न होते. आणि या बियाण्याला सध्या बाजारात भाव किलोला १००० रु. एवढा आहे. त्यामुळे या पिकापासून आपल्याला कमीत कमी ५ ते ६ लाखा पर्यंत एवढे उप्तन्न अपेक्षित आहे.
लागणार खर्च आणि विक्री
तर मित्रांनो चिया बियाणे शेतीसाठी एकरी कमीत कमी १० ते १५ हजारापर्यंत खर्च येतो जास्त खर्च तर बियाणे यासाठी येतो आणि रोपे तयार करून घेतले तर बियाण्याचा खर्च वाचतो मात्र लागवडीचा खर्च वाढतो. त्यामुळे अश्या अंदाजामध्ये एकरी खर्च आपल्याला लागू शकतो. तर विक्री चा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो चिया बियाणे या पिकाची विक्री आपण बाजारात तर करू शकतो मात्र या शेतीची माहिती शेतकऱ्यांनी लागण पूर्वीच काही नामांकित कंपन्यांना दिली तर त्या कंपनीचे एजंट शेतीतूनच या बियाण्यांची खरेदी करून घेऊन जातात.
chia seeds farming in marathi काय आहे चिया शेती ? एकरी उत्पन्न आहे ५ ते ६ लाखांपर्यंत
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार.