goat farming information in marathi शेळीपालन विषयी संपूर्ण माहिती.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे तर (goat farming information in marathi शेळीपालन विषयी संपूर्ण माहिती. हि शेती कशी करावी. आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून कोणत्याही शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.
तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेळीपालन विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. जेणेकरून जेही शेळीपालक शेतकरी आहे. त्यांना या ब्लॉग मध्ये जे हि बारकावे आपण देणार आहोत त्याचा त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. म्हणून आपण हि माहिती वाचावी आणि आपल्या शेळीपालन व्यवसायामध्ये जे आपल्याला बदल करायचे आहे ते बदल आपण करावेत.
या ब्लॉग मध्ये आपण शेळीपालनाचे फायदे, शेळीच्या जाती, बंदिस्त शेळीपालन, शेळ्यांचा आहार, शेळ्यांचे आजार आणि त्यावर प्रतिबंधक उपाय, विषबाधा, शेळ्यांचा विमा, करडांची विक्री, या विषयी संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.
१) शेळीपालनाचे फायदे. goat farming information in marathi शेळीपालन विषयी संपूर्ण माहिती.
तर मित्रांनो दिवसेंदिवस शेळीच्या मांसाची वाढती मागणी व कमी खर्चातील व्यवस्थापन यामुळे शेळीपालन हा जोडधंदा नसून एक स्वतंत्र फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. त्यामुळे आजचा शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण, मोठे उद्योजक हे श्लीपालनाकडे आकर्षित होत आहे.
आणि फायद्यांचा जर विचार केला तर शेळी हि गरीबाची गे म्हणून ओळखली जाते. कारण गाई-म्हशींच्या तुलनेत शेळीस कमी जागा, कमी खाद्य व कमी पाणी लागते. तसेच थोड्या काही अल्प गुंतवणूकीत हा व्यवसाय केला जातो. आणि शेळीची जात हि काटक असून ती कोणत्याही हवामानाशी जुळवून घेते. त्यामुळे रोगराईचा प्रमाण कमी असते. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपल्याला पैशाची आवश्यकता पडल्यास त्वरित काही शेळ्या विकून पैसे उभे केले जाऊ शकतात.
२) शेळीच्या जाती.
तर मित्रांनो आजच्या काळात भारतामध्ये शेळीच्या प्रमुख २५ जाती आढळून येतात. त्यामध्ये काही देशी जाती तर काही विदेशी जाती आहेत.
१) हिमालयात आढळणाऱ्या जाती : काश्मिरी, पश्मिना, गड्डी,
२) उत्तरप्रदेशात आढळणाऱ्या जाती : जमनापरी, बारबेरी, बीटल,
३) मध्यप्रदेशात आढळणाऱ्या जाती : मारवारी, महिसाना, झलवाडी, काठेवाडी,
४) दक्षिण भारतात आधणाऱ्या जाती : सुरती, उस्मानबादी, संगमनेरी, मलबारी,
५) विदेशी जाती : अल्पाइन, ऑग्लोन्युबियन, सानेन, टोगेनबर्ग, अंगोरा, बोअर, अश्या अनेक जाती आपल्या भारताबाहेर सुद्धा आहे. त्यातील काही जाती आज च्या काळात आपले भारतीय सुद्धा विदेशी जातींचे संगोपन करताना दिसं आहे. त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे विदेशी जातीच्या बोकडांचे वजन १०५ ते १३५ किलोपर्यंत वाढते.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
३) बंदिस्त शेळीपालन
शेळी हि जात नेहमी आपल्या नजरे समोर ठेवणारी वस्तू आहे कारण जर का अचानक शेळीची जात आपल्या नजरेसमोरून गेली तर हि कोणत्याही व्यक्तीच्या शेतामध्ये जाऊन त्या व्यक्तीचे नुकसान करू शकते त्यामुळे त्या जातीचे बंदिस्त प्रकारे करणे योग्य मानले जाते. शेळ्यांना कायमस्वरूपी बंदिस्त करून तेथेच चारा पाण्याची सोया करणे, करडांची सोया करणे, शेळ्यांचे दूध काढणे व लेंड्या गोळा करणे यालाच बंदिस्त शेळी पालन अशे आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो.
४) शेळ्यांचा आहार.
शेळ्यांच्या विशिष्ट पचनसंस्थेमुळे त्यांना चाऱ्याची गरज मुख्यतः तीन स्वरूपात लागते.
१) हिरवा चार , २) वाळलेला चारा, ३) पशुखाद्य आणि पूरक खाद्य
शेळीला पूर्णपणे हिरवा चार देणे चालत नाही. रोज प्रत्येकी किमान एक किलो वाळलेली वैरण देणे गरजेचे आहे. तसेच पशुखाद्याचे प्रमाण वयोगटानुसार द्यावे म्हणजे करडांना ५० ते १०० ग्राम शेळ्यांना २५० ते ३०० ग्राम आणि पैदाशीच्या बोकडांना ४०० ते ५०० ग्राम द्यावे.
५) शेळ्यांचे प्रमुख आजार आणि प्रतिबंधक उपाय.
पावसाळ्यामध्ये ओढे नदीनाल्यांचे पाणी गढूळ झालेले असते. दूषित पाणी पिण्यामुळे शेळ्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव होतो. शेळ्यांना हगवण लागते. अशक्तपणा येतो. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे शेळ्या आणि विशेषतः करडांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊन वार्षिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला व नंतर एक ते दिड महिन्याच्या अंतरावर कळपातील सर्वच शेळ्या व पिलांना जंतप्रतिबंधक औषध पाजावीत. शेळ्यांच्या शरीरातील पोटातील व आतड्यांमध्ये विविध जंतू कमीअधिक प्रमाणात असतातच. जेव्हा त्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा बाह्य लक्षणे दिसून येतात. त्यामुळे विष्टा प्रयोगशाळेत तपासणी करून पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार योग्य जंतुनाशक औषधोपचार केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
६) विषबाधा
दिवसांत तीव्र चाराटंचाईच्या दिवसांत शेतीपिकातील टाकाऊ पदार्थ उदाहरणार्थ तुरीचे, मुगाचे कुटार, घुईमुंगाचा पाला, भाजीपाल्यातील टाकाऊ पदार्थ, कडबाकुट्टी, उसाचे पाचट, बाभळीच्या शेंगा आवडीने खातात. औषधे फवारलेल्या पिकात किंवा धुऱ्यावर शेळ्या चारल्यास विषबाधा होते. विषारी वनस्पतीच्या सेवनामुळेदेखील विषबाधा होते. हिवरच्या शेंगा खाल्य्यामुळे बेशरम झाडाची पाणी, फुले खाण्यामुळे शेळी दगावते. अंगणातील वळत असलेले धान्य भरपूर खाल्यामुळे शेळ्यांचे पोट फुगते आणि त्यामुळे शेळी दगावते. अचानक शेळीने पॉलिथिन ची पिशवी खाल्ल्यामुळे ती पिशवी पोटात अडकते. त्यामुळे सुद्धा शेळी दगावते.
वरील सर्व परिस्थितीवर उपाय म्हणजे मोकाट पद्धतीने शेळ्या चारणे बंद करावे. त्यांना गोठ्यात ठेवावे. योग्य प्रमाणात चारा, वैरण व पशुखाद्य, पिण्याचे पाणी हि सर्व सोया गोठ्यात केली तर या सर्व गोष्टी घडणार नाही आणि कोणतीहि शेळी मारणार नाही आणि शेतकऱ्याचे कोणत्याची प्रकारचे नुकसान होणार नाही
७) शेळ्यांचा विमा
शेळ्यांची मरतूक होऊन धंदा नुकसानीत येऊ नये म्हणून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी किंवा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे शेळ्यांचा त्यांच्या खरेदी किमतीस विमा करावा.
८) करडांची विक्री
तर मित्रांनो शेळीपालन या व्यवसायामध्ये करडांची विक्री हा सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्धा आहे. आणि यावरच या सर्व व्यवसायाचे अर्थकलन अवलंबून आहे. करडांची वाढ हि सतत चालू राहणारी क्रिया असल्याने त्यांची विक्रीदेखील वर्षभर सतत चालू राहते. आवश्यकतेनुसार आणि बाजारभाव पाहून करडांची विक्री करावी. त्यामुळे वर्षभर पैशाची आवक राहील आणि पहिल्या वर्षानंतर वेगळ्या खेळत्या भासणार नाही.
goat farming information in marathi शेळीपालन विषयी संपूर्ण माहिती.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
2 thoughts on “goat farming information in marathi शेळीपालन विषयी संपूर्ण माहिती.”