अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा. click here
ladka bhau yojana how to apply लाडका भाऊ योजना काय आहे योजनेचे स्वरूप कसा करावा अर्ज बघा संपूर्ण प्रक्रिया.
तर मित्रांन्नो आज आपण आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नवीन योजनेच्या घोषणेविषयी माहिती देणार आहोत. जेणेकरून या योजनेमुळे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचा मोठा फायदा होईल. आणि तुमच्या कुटुंबाला काही प्रमाणात मदत होईल. तर मित्रांनो आपण हि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी अशी आपणास विनंती. कारण आमच्या krushipoint.com या वेबसाईट चा एक मात्र उद्देश म्हणजे राज्यातील प्रत्येक सामान्य कुटुंबाचा कोणत्या न कोणत्या प्रकारे होणार फायदा. तर बघूया सविस्तर.
तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी केली नवीन घोषणा. या आधी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती. पण मात्र या योजनेवर बऱ्याच सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा अक्षेप होता. तर आता दि. १७ जुलै रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात केलेल्या भाषणामध्ये माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केली.
त्यानंतर आता या योजनेसाठी जर तरुणांना अर्ज तर तो कसा करायचा त्याच बरोबर या योजनेसाठी कोण पात्र असेल आणि कोण अपात्र असेल आणि या योजनेचा कोणकोणत्या तरुणांना फायदा मिळेल याची सविस्तर माहिती आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून बघणार आहोत.
काय आहे या योजनेचा उद्देश. (ladka bhau yojana how to apply)
तर मित्रांनो महाराष्ट्रातील राज्य सरकारने सुरु केलेल्या या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. म्हणूनच या प्रशिक्षणादरम्यान युवकांना आणि विध्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदत म्हणून दिले जाईल. त्यामुळे भविष्यात या तरुणांना स्वयंरोजगार मिळेल आहि आता सध्या असलेले बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा कमी होईल. या साठी सरकार ६००० कोटी रुपये खर्च करणार आहे.
कोणत्या तरुणांना मिळणार या योजनेचा लाभ.
तर मित्रांनो या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत प्रशिक्षण तर मिळणारच आहे. तर मात्र या सोबत बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला १० हजार एवढा आर्थिक मदतीचा लाभ सुद्धा आहे.
१) तर मित्रांनो १२ वि उत्तीर्ण तरुणांना प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकारकडून दरमहिन्याला ६,००० रुपये देणार आहे.
२) त्याच बरोबर आय टी आय किंवा कोणत्याही क्षेत्रातील डिप्लोमा झालेला असेल तर अशा तरुणांना राज्य सरकार ८,००० रुपये देणार आहे.
३) तर ज्या तरुणांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये पदवी घेतलेली असेल अश्या तरुणांना राज्य सरकार १०,००० रुपये देणार आहे.
अर्ज प्रक्रिया (ladka bhau yojana how to apply)
१) यासाठी महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. तर या वेबसाईट ला घेत द्या.
२) त्यानंतर नवीन वापरकर्ता म्हणून (New User Registration) या पर्यायावर क्लिक करून पुढे या.
३) त्या नंतर तुमच्या समोर एक अर्ज दिसेल.
४) तो अर्ज पूर्ण काळजीपूर्वक भरून घ्या. त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता या सारखी संपूर्ण व्यवस्थिक टाका.
५) त्या नंतर त्यात नमूद केलेली आवश्यक सर्व कागदपत्र अपलोड करुण घ्या.
६) त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या समोर सबमिट बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा.
७) हे सर्व झाल्यानंतर लाडका भाऊ योजना महाराष्ट्र २०२४ अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली दिसेल.
काय आहे अटी आणि शर्ती.
१) तर मित्रांनो या लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
२) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय हे १८ ते ३५ वर्ष्यांच्या आत असणे आवश्यक आहे.
३) त्याच बरोबर अर्जदाराचे बँक खात्याशी आधारकार्ड जोडलेले असणे गरजेचे आहे.
४) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे.
५) या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता हि कमीत कमी १२ वि पास, तसेच डिप्लोमा, किंवा पदवीधर एवढी असावी.
या योजनेमुळे होणारे फायदे
या योजनेमुळे मोफत प्रशिक्षण मिळेल आणि त्यामुळे प्रत्येक युवक सहज सुरु करू शकतो. त्याच बरोबर या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदीसाठी मदत होईल. त्याच बरोबर लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक रक्कम हि तरुणांच्या वैक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल. हि योजना राज्यातील प्रत्येक तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढविण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. असे हि आपण म्हणू शकतो.
अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा. click here
ladka bhau yojana how to apply लाडका भाऊ योजना काय आहे योजनेचे स्वरूप कसा करावा अर्ज बघा संपूर्ण प्रक्रिया.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार.