sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन

sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन

sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन
sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन ?
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

शेतकरी मित्रांनो आपण आज तीळ या तेल बिया च्या शेती विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. त्यामध्ये असे बरेच काही बारकावे आहे. कि जे आपल्याला माहित नाही ते म्हणजे पुढील प्रमाणे त्यामध्ये तिळाचे उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती कोणत्या, त्याच बरोबर तिळाची लागवड व कालावधी, सर्वात जास्त उत्पादित राज्य तसेच पीक संरक्षण पीक काढणी, होणारे उत्पन्न, या सारखे अनेक बारकावे आपण या लेखातून बघणार आहोत.

तीळ या पिकाची लागवड (sesame seeds farming in india)

मित्रांनो सुरुवातीला बरेचसे बारकावे आहेत कि ते आपल्याला महतीच नाही. त्यामध्ये मुख्य म्हणजे जमिनीची निवड तर तीळ या पिकास माध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. नंतर जमिनीची मशागत तर सुरुवातीला नगराट करून त्यानंतर जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी जेणेकरून पीक उगवण्यास अडथळे येणार नाही. त्यानंतर येते बीज प्रक्रिया यासाठी बुरशीजन्य रोग होवू नये म्हणून पॅरोलॉजी किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे त्यानंतर २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावावे.

त्यानंतर असतो पेरणीचा योग्य वेळ तो म्हणजे जूनच्या दुस-या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यत. त्यानंतर येते पेरणीचे अंतर तर मित्रांनो तीळ लागवडीसाठी कमीत कमी ४५ X १० सें.मी किंवा ३० X १५ सें.मी अंतरावर अनुक्रमे ४५ सें.मी. अंतराच्या पाभरीने पेरणी करावी. या लागवडीसाठी एकरी १ किलो पर्यंत बियाणे लागते.

चांगल्या बियाणांची निवड. (sesame seeds farming in india)

फुले तीळ नं.१, तापी (जे.एल.टी.७), पदमा (जे.एल.टी.२६), जे.एल.टी. ४०८ या सारख्या अनेक जाती आहेत कि त्या आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे.

तीळ पिकासाठी खतव्यवस्थापन (sesame seeds farming in india)

पूर्व मशागतीच्या वेळी प्रति हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत अगोदर जमिनीत मिसळावे किंवा हेक्टरी एक टन (एकरी ४ क्विंटल) एरंडी किंवा निंबोळी पेंड पेरणी करत असताना द्यावे. अधिक २५ किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीच्या वेळी व २५ किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर तीन आठवड्यांनी पेरून द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्यावेळी २० किलो गंधक प्रति हेक्टरी देणे गरजेचे आहे.

sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन
sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन
सर्वात जास्त उत्पादित राज्य

शेतकरी मित्रांनो सध्या च्या माहिती नुसार तर आपल्या भारतातील तिळाचे सर्वात मोठे उत्पादक कोणते राज्य आहे? 23% उत्पादनासह मध्य प्रदेश आणि राजस्थान हे सर्वात मोठे उत्पादक आहेत.

पीक संरक्षण पीक काढणी

मित्रांनो जर आपल्या तीळ या पिकावर पाने गुंडाळणारी अळी/पाने खाणारी अळी/तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा फेन्व्हलरेट २०% प्रवाही २५० मिली किंवा ५० % कार्बेरील पावडर २ किलो प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याने या रोगांवर लवकर नियंत्रण येते. त्याच बरोबर पानावरील ठिपके व अणूजीव करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास मॅन्कोझेब ७५% १.२५ किलो + स्ट्रेप्टोसायक्लीन ५० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोरॉईड १.२५ किलो + स्ट्रेप्टोसायक्लीन ५० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी म्हणजे यामुळे उत्पन्नात होणारी मोठी घट होत नाही.

त्यानंतर प्रश्न पडतो कि या तीळ पिकाची काढणी कधी करावी तर मित्रांनो साधारणपणे ७५ % पानाचा व खोडाचा रंग पिवळसर झाल्यावर आपण असे समजावे कि पीक काढणीस आले. साधारण ८० ते ९५ दिवसात पीक काढणीस येते. काढणी लवकर केल्यास बोंडातील तीळ पोचट व बारीक राहुन उत्पादनात घट येते, यामुळे तीळ पिकाची काढणी वेळेवर केलेले कधीही चांगले, काढणी उशिरा केल्यास बोंडे फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी.

उत्पादन

शेतकरी मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे उत्पादन आणि होणारे उत्पन्न तर मित्रांनो या तीळ पिकाचे साधारण हेक्टरी ८ ते १० क्विंटक एवढे उत्पन्न होते. आणि या पिकाला साधारण १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत एका क्विंटल ला भाव मिळतो.

sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

2 thoughts on “sesame seeds farming in india तिळ बियांचे आहे सर्वात जास्त उत्पन्न, कसे करावे लागवड व्यवस्थापन”

Leave a comment