mahamesh yojana 2024 apply online मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे mahamesh yojana 2024 apply online मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.
शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन योजने विषयी माहिती बघणार आहोत. आणि हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. तर शेतकरी मित्रांनो बघूया सविस्तर माहिती. आणि काय आहे. या योजनेचे स्वरूप. सध्याच्या जागतिक हवामानातील बदल आणि नैसर्गिक पावसातील अनियमिततेमुळे राज्यातील शेती व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून संपूर्ण शेतकरी बांधवांना धीर म्हणून राज्य शासन काहींना काही करत असते. या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना घेऊन येत असते त्यातीलच एक म्हणजे.
mahamesh yojana 2024 apply online मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू
नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना होय. याच योजनेकरिता २०२४-२५ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहे. आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाची माहिती आज च्या या ब्लॉग च्या माध्यमातून देणार आहोत.
मित्रांनो राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती करता राबविली जाणारी हि एक महत्वाची योजना आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत विविध बाबींचा लाभ हा या लाभार्थ्यांना दिला जातो. मित्रांनो राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वघळता उर्वरित सर्व जिल्ह्यामध्ये भटक्या जमाती क प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांसाठी हि योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेकरिता अर्ज मागविण्यासाठी १२ सप्टेंबर २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ हि मुदत देण्यात आलेली आहे. अर्थात या योजनेचे अर्ज २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत स्वीकारले जाणार आहे.
यामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये स्थाई आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालन यांच्यामध्ये पायाभूत सुविधे सह २० मेंढ्या आणि १ मेंढा नर अशा २० मेंढी गटाचं ७५ टक्के अनुदानावरती वाटप केली जाणार आहे. ज्या मध्ये लाभार्थ्याला साधारण पणे २. लाख रुपये पर्यंतच अनुदान दिल जात. या योजने अंतर्गत ज्यांच्याकडे आधीपासूनच शेळ्या मेंढया आहेत अश्या लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे लाभ दिला जातो.
mahamesh yojana 2024 apply online मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू
ज्याच्यामध्ये सुधारित प्रजातींच्या नर मेंढायचं ७५ टक्के अनुदानावरती वाटप मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्द करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान मेंढी पालनासाठी संतुलित खाते उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान याच प्रमाणे हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता ते यंत्र खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान पशु खाद्य उभारणी साठी ५० टक्के अनुदान अशा विविध बाबी देखील लाभवल्या जातात. याच प्रमाणे मेंढ्यांसाठी चराई अनुदान ज्या मेंढपाळ कुटुंबांकडे किमान २० मेंढया आणि १ नर मेंढा एवढं पशुधन आहे. अश्या पशुधन कुटुंबांना माहे जून ते या ४ महिन्याच्या कालावधीसाठी प्रति महा ६ हजार रुपये असे एकूण २४ हजार रुपये असं चराई अनुदान वाटप केलं जात.
याच प्रमाणे कुकूट पक्षाच्या खरेदी आणि संगोपनासाठी अनुदान यांच्यामध्ये ४ आठवे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुकूट पक्ष्यांच्या खरेदी आणि संगोपनासाठी ९ हजार रुपयाच्या मर्यादीमध्ये ७५ टक्के अनुदान दिले जाते.
याच प्रमाणे ज्या भूमिहीन मेंढपाळांकडे शेळी मेंढी आहेत. अश्या मेंढपाळांना जागा खरेदी साठी सुद्दा या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जात. यांच्यामध्ये बंधिस्त शेळी मेंढी पालनाकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागा खरेदीच्या ७५ टक्के अथवा किमान ३० वर्षाकरिता भाडेकरारावर्ती जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम किंवा एक वेळीच एक रकमी अर्थसहाय्य म्हणून ५० हजार रुपये एवढे अनुदान दिल जात. आणि मित्रांनो याच योजनेकरिता. १२ सप्टेंबर २०२४ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरु झालेले आहेत.
या योजनेसाठी जर आपणास अर्ज करायचा असेल तर आपण WWW.Mahamesh.org या संख्या स्थळावरती अर्ज करू शकता. अर्ज करणारा लाभार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा आणि वय १८ ते ६० वयोगटातील असावे
लागणारे कागदपत्रे
१) जातीचा दाखला
२) आधार कार्ड
३) रेशन कार्ड
४) बँक पासबुक
५) सातबारा किंवा ८ अ
mahamesh yojana 2024 apply online मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
1 thought on “mahamesh yojana 2024 apply online मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू”