basil seeds farming सब्जा शेती विषयी माहिती बघूया सविस्तर, कमी जागेत मिळेल अधिक नफा
basil seeds farming
difference between chia seeds and basil seeds
sabja seeds in marathi sabja seeds uses
what is sabja seeds how to use sabja seeds
sabja farming
sabja seeds information in marathi
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखाच्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (basil seeds farming) सब्जा शेती विषयी माहिती बघूया सविस्तर, कमी जागेत मिळेल अधिक नफा
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.
तर शेतकरी मित्रांनो आपण आज सब्जा शेती म्हणजे काय आणि या शेती विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो आपण आज या शेती विषयी पुढील काही महत्वाचे मुद्दे बघणार आहोत. त्यामुळे आपल्या मनातील जे हि काही प्रश्न आहे ते नक्कीच सुटतील. त्यामध्ये सब्जा शेती म्हणजे कोणती शेती, सब्जा ची लागवड कशी करावी, या पिकासाठी उपयुक्त जमीन, पाणी व्यवस्थापन, काढणी कापणी पद्धती, उत्पन्न आणि विक्री या महत्वाच्या मुद्द्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत.
1) सब्जा शेती म्हणजे कोणती शेती. basil seeds farming
तर शेतकरी मित्रांनो सब्जा हे पीक भारतामध्ये आणि आणखीन काही देशांमध्ये आपल्याला आढळून येईल. तर जस जसे आपण बघू शकतो तस तसे ह्या पिकाचे नाव बदलले जाते जसे कि काही राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये याला तूकमरिया, फालुदा सीड्स, मुलंगा सीड्स, तर त्याला इंग्रजी मध्ये (basil seeds) म्हणून ओळखले जाते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला तुळशीच्या बिया किंवा सब्जा म्हणूनच ओळखले जाते. तर काहींना असा समज आहे कि सब्जा आणि चिया हे दोन्ही पिके एकच आहे तर मित्रांनो असे काही नाही सब्जा हे एक वेगळे पीक आहे. आणि हे भारतीय पीक आहे तर चिया हे मध्य आणि दक्षिण मेक्सिको या भागात मिळते.
2) सब्जा ची लागवड कशी करावी. basil seeds farming
तर मित्रांनो आपण या सब्जा पिकाची लागवड ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात करू शकतो आणि या साठी आपल्याला कमीत कमी २ ते ३ किलो च्या पर्यंत बियाणे लागते. तर आपण या बियाण्याची लागवड संपूर्ण जमिनीत फेकून आपण या पिकाची लागवड करू शकतो. तर या पिकाचा कालावधी हा जवळ जवळ ९० ते १२० दिवसाचा असतो. तर या पिकाची लागवड करून झाल्यावर ४० ते ५० दिवसातच या पिकामध्ये आणि पुढील २५ ते ३५ दिवसात बिया पिकून तयार होतात.
3) उपयुक्त जमीन, पाणी व्यवस्थापन. basil seeds farming
शेतकरी मित्रांनो या पिकासाठी जर जमिनीचा विचार केला तर बर्याच अहवालांमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून असे म्हटले गेले आहे की त्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सहज करता येते. तथापि, हलकी माती असलेल्या मातीमध्ये त्याचे पीक चांगले आहे. तसेच यामध्ये कीटकनाशकांची फारशी गरज नसते आणि शेणखतदेखील यासाठी फार प्रभावी आहे.
त्याच बरोबर पाणी व्यवस्थापन हा हि एक खूप सोपा मुद्दा आहे. ते कसे तर आपण लागवड करत असलेल्या जमिनीवर अवलंबून असते कि या पिकाला किती दिवसाच्या अंतरावर आपण पाणी देऊ शकतो. कारण जमीन जर हलकी आणि मध्यम असेल तर आपण १० ते १२ दिवसाने पाणी देऊ शकतो. तर जमीन हि काली आणि चिकन असेल तर आपण १५ ते २० दिवसांनी देखील पाणी देऊ शकतो.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
4) काढणी कापणी पद्धती.
सब्जा हे पीक तयार झाल्यावर आपण या पिकाची कंपनी करून घ्यावी आणि काही दिवस वाळायला शेतातच ठेऊन पूर्णपणे वाळवून झाल्यानंतर त्याला मळणीयंत्राच्या साहाय्याने बियाणे वेगळे करून घ्यावे आणि त्यानंतर ते बियाणे बाजारात विक्री साठी तयार झालेले असेल.
5) उत्पन्न आणि विक्री.
शेतकरी मित्रांनो मुख्यता एका एकर मध्ये या बियाणायची लागवड केली असता आणि या पिकाला चांगल्या प्रकारचे हवामान जमीन आणि पाणी मिळाले तर या पिकापासून आपल्याला एकरी ७ ते ८ क्विंटर पर्यंत जाते तर या पिकाला मुख्यतः कधीही योग्य तो भाव असतो. म्हणजे काही जास्त प्रमाणात कमी जास्त न होता. १००० ते १२०० रु. किलो पर्यंत चा भाव या पिकाला मिळतो.
basil seeds farming
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here