flax seeds in marathi जवस पिकाचे लागवडव्यवस्थापन कमी दिवसात आहे जास्त उत्पन्न
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे flax seeds in marathi जवस पिकाचे लागवडव्यवस्थापन कमी दिवसात आहे जास्त उत्पन्न ?
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.
शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून जवस पिकाचे लागवड व्यवस्थापन या विषयी माहिती बघणार आहोत.
तर मित्रांनो आपण आज जवस या पिकाच्या विषयी पुढील माहिती बघणार आहोत. यामध्ये जवस लागवड कशी करावी यासाठी लागणारी जमीन, पेरणी कशी करावी, त्याच बरोबर बीज प्रक्रिया व बियाण्याची निवड या साठी लागणारे खात व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन या मध्ये केल्या जाणारी अंतर मशागत या वरील येणारी किडी, रोग व्यवस्थापन जवस या पिकाची काढणी व या मध्ये होणारे उत्पन्न या सर्व बाबींविषयी आपण माहिती बघणार आहोत.
तर शेतकरी मित्रांनो या जवस पीक लागवडीसाठी माध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी जमीन आवश्यक आहे. जवसाची पेरणी योग्यवेळी झाल्यास या पिकावर येणारी गादमाशी या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे कोरडवाहू पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात तर बागायती पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात करणे योग्य आहे. या नंतर गरज पडते ती म्हणजे बीजप्रक्रिया करण्याची त्यासाठी पेरणीआधी १ ग्रॅम बावीस्टीन + २ ग्रॅम थायरम प्रती किलो बियाण्यास चोळावे. यामुळे मर व अल्टरनॅरीआ ब्लाईट रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. तर मित्रांनो त्यानंतर प्रश्न पडतो कि या जवस बियाण्याची लागवड कशी करावी तर मित्रांनो ४५X१० सेंमी किंवा ३०x१५ सेंमी अंतरावर करावी. त्यासाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे लागते. व यामध्ये आपण अंतर पीक म्हणून हरभरा करडई मोहरी या सारखी पिके घेऊ शकतो.
जवस पिकाचे सुधारित वाण (flax seeds in marathi)
तर मित्रांनो आज च्या काळात जवस या पिकाचे बरेचसे सुधारित वन आपल्याला बघायला मिळतील मात्र त्या मधून काही निवडक वन आहे. जे कि आपण लागवड करू शकतो. एन.एल -२६०, एन.एल -१६५, एन.एल -१४२, एन.एल -९७ अशा प्रकारचे सुधारित वाण आपण आपल्या जमिनीत जास्त प्रमाणात लागवड करू शकतो.
खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन
तर मित्रांनो जवस लागवड करताना कोरडवाहू जवस लागवडीसाठी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद / हेक्टरी (म्हणजेच १२५ किलो २०:२०:० मिश्रखत) पेरणीच्या वेळी द्यावे, तसेच बागायती लागवडीसाठी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद / हेक्टरी देणे गरजेचे आहे. तसेच या पिकास ५ किलो पीएसबी व ५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळेस द्यावे.
या पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव आढळुन येतो. या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच या पिकावर अल्टरनेरीया ब्लाईट, भुरी व मर हे रोग आढळुन येतात. अल्टरनेरीया ब्लाईट या रोगाच्या नियंत्रणासाठी ३ ग्रॅम प्रती किलो थायरमची बिजप्रकीया करावी तसेच मॅन्कोझेब ०.२५ टक्केची फवारणी करावी (२५ मिली १० लिटर पाणी) भुरी रोगाचा प्रसार हवेद्वारे होत असते. या रोगाचे नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी २५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून रोग दिसताक्षणी फवारणी करू शकता.
तसेच मित्रांनो या जवस पिकासाठी आपण जास्त पाणी दिले नाही तरी काही हरकत नाही. या पिकास दोन पाण्याची आवश्यकता आहे. पहिले पाणी पीक फुलोऱ्यावर असतांना म्हणजेच ४०-४५ दिवसांनी, दुसरे ओलीत ६५-७० दिवसांनी (बोंड्या धरण्याच्या वेळी) आपण देऊ शकतो.
जवस पिकधी काढणी आणि होणारे उत्पादन
तर शेतकरी मित्रांनो जवस या पिकाची काढणी आपण पिकाची पाने व बोंडे पिवळी पडल्यावर पीक काढणीस योग्य समजून. पिकाची कापणी करून पीक ४-५ दिवस वाळवून नंतर मळणी करावी व बियाणे स्वच्छ करावे. तर या जवस पिकापासून हेक्टरी आपल्याला ८-१० क्विंटल उत्पादन मिळते. आणि आता सध्याच्या काळात या पिकाला २०० ते २५० रुपया पर्यंत भाव आल्याला मिळू शकतो.
flax seeds in marathi जवस पिकाचे लागवडव्यवस्थापन कमी दिवसात आहे जास्त उत्पन्न
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
1 thought on “flax seeds in marathi जवस पिकाचे लागवडव्यवस्थापन कमी दिवसात आहे जास्त उत्पन्न”